अॅप्पल चा आयओएस 11.3 आता आयफोन, आयपॅड आणि आइपॉड टच (6th Gen) च्या यूजर्सना डाउनलोड साठी उपलब्ध झाला आहे. अॅप्पल च्या आयओएस 11.3 काही नवीन सुविधांसह हा एक मोठा स्प्रिंग अपडेट आहे. आयओएस 11.3 सह यूजर आपल्या आयफोन च्या बॅटरी ची हेल्थ बघू शकतील. कदाचित यामुळे याच्या परफॉर्मेंस वर परिणाम होऊ शकतो. अॅप्पल ने यात मागच्या वर्षी दिलेल्या अश्वासनानुसार नवीन फीचर्स चा समावेश केला आहे. अॅप्पल च्या आयओएस 11.3 अपडेट आयओएस सेटिंग्स मध्ये 'सॉफ्टवेयर अपडेट' पर्याया मध्ये डाउनलोड साठी उपलब्ध केला गेला आहे.
कसे तुम्ही iOS 11.3 ला आपल्या iPhone आणि iPad मध्ये करू शकता डाउनलोड
या अपडेट ची साइज 781MB आहे. त्यामुळे तुमच्या वाई-फाई स्पीड नुसार डाउनलोड करायाला वेळ लागेल. यासाठी तुम्हाला तुमच्या iPhone च्या सेटिंग मध्ये जावे लागेल त्यानंतर तुम्ही General मध्ये जाऊन सॉफ्टवेयर अपडेट विभागात जाऊन हा अपडेट बघू शकता, इथे तुम्हाला हा अपडेट मिळेल. हा अपडेट मिळवण्यासाठी फक्त तुमच्या कडे चालू वाई-फाई कनेक्शन असण्याची गरज आहे.
जर तुम्ही तुमच्या मोबाईल डेटा ने याला डाउनलोड करण्याचा प्रयत्न कराल तर ते शक्य नाही. त्यासाठी तुमचे वाई-फाई वर असणे आवश्यक आहे. त्याच बरोबर एक अजून महत्वाची बाब म्हणजे तुमच्या फोन मध्ये 50 टक्के चार्ज असणे गरजेचे आहे. जर असे नसेल तर तुमच्या फोन मध्ये हा अपडेट येणार नाही.
या नव्या अपडेट मध्ये तुम्हाला हे सर्व मिळत आहे
या नव्या अपडेट मध्ये तुम्हाला खुप काही मिळत आहे, सर्वात आधी या बद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला काही नवीन Animoji फीचर मिळत आहे. याव्यतिरिक्त तुम्हाला यावेळेस ऑगमेंटेड रियलिटी फीचर पण मिळत आहेत. सोबतच या अपडेट नंतर तुम्ही आपली बॅटरी ची हेल्थ बघू शकता. डेटा आणि प्राइवेसी च्या बाबतीत पण खुप काही आहे.
या नवीन अपडेट मध्ये तुम्हाला हेल्थ रिकार्ड्स इत्यादि मिळतील. याव्यतिरिक्त बिजनेस चॅट इत्यादि यात तुम्हाला मिळत आहे. सोबतच काही अन्य फीचर्स पण मिळत आहेत,ज्यात तुम्ही आता कोणत्याही जाहिराती विना विडियो इत्यादी बघू शकता. याव्यतिरिक्त तुम्ही आता दिवसातील सर्वात खास विडियो पण बघू शकाल. तसेच आता बीजिंग आणि शांघाई चे यूजर्स अॅप्पल च्या माध्यमातून मेट्रो आणि बस मध्ये पे करू शकतील.