इंटेक्सने PC सेगमेंटमध्ये पुन्हा एकदा प्रवेश करुन आपला नवीन LED मॉनिटर 1901 लाँच केला आहे. हा मॉनिटर 18.5 इंचाचा आहे. ह्याची किंमत केवळ ६,००० रुपये आहे.
इंटेक्स टेक्नॉलॉजीने मॉनिटर सेगमेंटमध्ये पुन्हा एकदा पाऊल टाकत आपला नवीन LED मॉनिटर 1901 लाँच केला आहे. ह्या मॉनिटरचे डिझाईन थोडेसे स्लीकी आहे आणि ह्याला एक ग्लॉसी फिनिश असलेला फ्रेमसुद्धा दिली गेली आहे. ह्या दोन्ही वैशिष्ट्यांमुळे हा एक उत्कृष्ट डिझाईन असलेला आकर्षक आणि प्रीमियम मॉनिटर बनला आहे. ह्या मॉनिटरमध्ये आपल्याला अंतर्गत स्टिरियो स्पीकर्ससुद्धा मिळतील. ह्या मॉनिटरची किंमत केवळ ६,००० रुपये आहे.
डिस्प्लेच्या गुणवत्तेत बदल करुन इंटेक्सने ह्यावेळी आपल्या ह्या मॉनिटरला उत्कृष्ट LED बॅक लायटिंग असलेली डिस्प्ले दिली आहे. त्याच्या माध्यमातून आपल्याला आकर्षक व्ह्यूविंग अनुभव मिळेल. त्याचबरोबर तुम्हाला ह्या मॉनिटरच्या माध्यमातून उत्कृष्ट रिस्पॉन्स टाईमसुद्धा मिळेल. ह्याची फोटो क्वालिटीसुद्धा चांगली आहे.
हा मॉनिटर ४७ सेमीचा पॅनल आहे आणि आपल्यापर्यंत उत्कृष्ट फोटो आणि व्हिडियो पाठवण्यासाठी ह्याने कोणतीच कसर सोडलेली नाही. ह्या मॉनिटरच्या डिस्प्लेच्या माध्यमातून आपल्याला असे वाटेल की, आपण त्या ठराविक ठिकाणीच आहोत आणि जे आपण पाहत आहात, ते आपल्या जवळपासच घडतय. आपल्याला एखादा 3D बघितल्याचा अनुभव मिळेल. हा मॉनिटर विजेचाही जास्त वापर करत करत नाही. केवळ 20W एवढीच वीज घेतो. ह्याचे वजन केवळ १,४ किलोग्रॅम आहे.