इंटेक्सने बाजारात आपला नवीन टॅबलेट I-Buddy IN-7DD01 लाँच केला आहे. ह्या टॅबलेटचे वैशिष्ट्य म्हणजे, ह्याने कॉल्सही करु शकता. ह्याची किंमत ४,७९९ रुपये आहे. हा टॅबलेट ऑनलाइन शॉपिंग साइट अॅमेझॉन इंडियावर खरेदी केला जाऊ शकतो. हा काळ्या रंगात उपलब्ध आहे.
ह्या टॅबलेटमध्ये 7 इंचाची HD डिस्प्ले दिली गेली आहे. ह्याचे डिस्प्ले रिझोल्युशन 1024×600 पिक्सेल आहे. हा मिडियाटेक MT8321 क्वाड-कोर प्रोसेसर आणि 1GB रॅमने सुसज्ज आहे.
हेदेखील वाचा – जुलै २०१६ मधील भारतातील सर्वोत्कृष्ट बजेट स्मार्टफोन्स
ह्यात 8GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा आहे. ह्या स्टोरेजला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो. हा अॅनड्रॉईड लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे.
ह्यात 2 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 0.3 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. हा टॅबलेट 2800mAh ची बॅटरी दिली गेली आहे. ह्याचा आकार 188x108x10mm इतका असून ह्याचे वजन 270 ग्रॅम आहे.
हेदेखील वाचा – जनतेच्या सुरक्षेच्या प्रश्नासाठी महाराष्ट्र पोलिसांनी सुरु केले ४ नवीन अॅनड्रॉईड अॅप्स…
हेेदेखील वाचा – 4GB रॅमने सुसज्ज असलेला ऑनर 8 स्मार्टफोन लाँच