Important! आता UPI RuPay कार्डद्वारे UAE मध्ये देखील करता येईल पेमेंट, PM मोदींनी केला शुभारंभ। Tech News
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय UPI पेमेंट सेवेचा जागतिक स्तरावर प्रचार करत आहेत.
12 फेब्रुवारी रोजी श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये UPI आणि RuPay कार्ड सेवा सुरू
13 फेब्रुवारीला PM मोदींनी अबू धाबीमध्ये UPI रुपे कार्ड सेवा सुरू केली आहे.
भारताचे आजी पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय UPI पेमेंट सेवेचा जागतिक स्तरावर प्रचार करत आहेत. नुतकेच म्हणजेच 12 फेब्रुवारी रोजी PM मोदींनी श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये UPI आणि RuPay कार्ड सेवा सुरू केली. त्यानंतर 13 फेब्रुवारीला त्यांनी अबू धाबीमध्ये UPI रुपे कार्ड सेवा सुरू केली आहे. UAE चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्यासह PM मोदी यांनी UPI RuPay कार्डद्वारे पहिले पेमेंट करून या सर्विसचा शुभारंभ केला.
हे सुद्धा वाचा: Affordable! नवा Moto G04 फोन भारतात 16GB रॅमसह भारतात लाँच, किंमत फक्त 6249 रुपये। Tech News
UAE मध्ये UPI RuPay कार्ड सेवा सुरु
पंतप्रधान मोदी सध्या संयुक्त अरब अमिराती (UAE) दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी PM मोदींनी अबुधाबीमध्ये UPI रुपे कार्ड सेवा सुरू करून भारतीयांना मोठी भेट दिली. याक्षणी त्यांच्यासोबत UAE चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयानही उपस्थित होते. तुम्ही वरील पोस्टमध्ये याबाबतचा Video बघू शकता.
UPI RuPay कार्डद्वारे UAE मध्ये पहिली पेमेंट
वर सांगितल्याप्रमाणे, भारताचे पंतप्रधान मोदींनी UAE मध्ये UPI RuPay कार्डद्वारे UAE राष्ट्रपतींसमोर पहिले पेमेंट केले. या सेवेमुळे भारतातून UAE ला जाणाऱ्या प्रवाशांना आता खूप मोठा फायदा होणार आहे. आता ते त्यांच्या UPI RuPay कार्डद्वारे कोणत्याही अडचणीशिवाय UAE मध्ये सहज क्रॉस बॉर्डर पेमेंट करू शकतात. त्याबरोबरच, UAE मध्ये सुरु होण्याच्या केवळ एक दिवसापूर्वी श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये देखील सुरु झाली आहे. मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दरम्यान या दोन देशांमध्ये UPI सेवेचा शुभारंभ केला.
तुमच्या माहितीसाठी सांगतो की, श्रीलंका आणि मॉरिशसपूर्वी भारताची UPI पेमेंट सेवा इतर अनेक देशांमध्ये सुरू करण्यात आली आहे. या देशांमध्ये फ्रान्स, सिंगापूर, नेपाळ, भूतान इ. समाविष्ट आहेत. तर, आगामी काळात इतर अनेक देश भारताच्या UPI पेमेंट सिस्टममध्ये सामील होतील, अशी देखील अपेक्षा आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile