सध्या लोकांमध्ये वेब सिरीजची खूप क्रेझ आहे. त्यातही फॉरेन वेब सीरिजची तरुणाईमध्ये भलतीच क्रेझ दिसते. पण तुम्हाला माहीत आहे का, अशा अनेक सुपरहिट भारतीय वेब सीरीज आहेत, ज्या इंग्लिश सिरीजचे रूपांतर आहेत. चला तर मग बघुयात, कोणत्या इंग्रजी वेब सिरीज आहेत, ज्यांचा हिंदी रिमेक करण्यात आला आहे.
हे सुद्धा वाचा : Realme च्या फोनमध्ये मिळेल iPhone सारखे डायनॅमिक आयलँड, बघा पहिली झलक
OTT प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar ची वेब सिरीज 'क्रिमिनल जस्टिस' ही त्याच शीर्षकाच्या ब्रिटिश सिरीजचे रूपांतर आहे. 'क्रिमिनल जस्टिस' या वेबसिरीजचे आतापर्यंत तीन सीझन रिलीज झाले आहेत. या सिरीजच्या या तीन सीझनची कथा अशा लोकांवर आधारित आहे जे कोणताही गुन्हा न करता तुरुंगात शिक्षा भोगत आहेत.
बॉलीवूडचे सुपरस्टार अजय देवगणनेही वेब सीरिजच्या दुनियेत पदार्पण केले आहे. अजय देवगणने Disney Plus Hotstar च्या 'रुद्र – द एज ऑफ डार्कनेस' या वेब सीरिजमध्ये आपली क्षमता दाखवली आहे. अजयची ही सिरीज ल्यूथर या ब्रिटिश सिरीजचा अधिकृत रिमेक आहे. ज्यामध्ये हॉलिवूड अभिनेता इद्रिस एल्बा मुख्य भूमिकेत होता.
बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने 'आर्या' या वेबसिरीजद्वारे बऱ्याच कालावधीनंतर पुनरागमन केले आहे. सुष्मिताची 'आर्या' ही टॉप भारतीय वेब सीरीजपैकी एक मानली जाते. Disney Plus Hotstar याOTT प्लॅटफॉर्मवर सुष्मिता सेनचा आर्या 'पेनोजा' नावाच्या डच ड्रामा सीरियलवर आधारित आहे.
बॉलीवूड अभिनेत्री दिया मिर्झाची प्रसिद्ध वेब सीरिज 'कॉल माय एजंट – बॉलीवूड' हे फ्रेंच शो 'कॉल माय एजंट'चे रूपांतर आहे. तुम्ही ही मालिका OTT प्लॅटफॉर्म Netflix वर सहज पाहू शकता.