Happy Independace Day 2024: ‘या’ भारी WhatsApp मॅसेजेस आणि Status द्वारे देशभक्तांना द्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, अशाप्रकारे Video डाउनलोड करा
दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी संपूर्ण भारतात स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो.
यावर्षी भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे.
स्वतंत्र्यदिनानिमित्त सर्व देशभक्तांना WhatsAppद्वारे जबरदस्त शुभेच्छा पाठवा.
भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी स्वातंत्र्य दिन हा अभिमानाचा दिवस असतो. दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी संपूर्ण भारतात हा दिवस साजरा केला जातो. आपण सर्वांना माहितीच आहे की, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला इंग्रजांच्या गुलामीपासून सुटका मिळाली. यावर्षी देशाचा 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. हा दिवस साजरा करण्यासाठी देशभरात शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयांमध्ये ध्वजारोहणासह देशभक्तिपर कार्यक्रम ठेवले जातात. तुम्ही देखील तुमच्यापासून लांब राहत असलेल्या देशभक्तांना WhatsAPP द्वारे शुभेच्छा पाठवू शकता.
आम्ही तुमच्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या काही जबरदस्त शुभेच्छांची यादी देखील तयार केली आहे.
- उत्सव तीन रंगाचा, आज आभाळी सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
- ज्याचा मुकूट आहे हिमालय, जिथे वाहते गंगा जिथे आहे विविधतेत एकता सत्यमेव जयते आहे आमचा नारा जिथे धर्म आहे भाईचारा तोच आहे भारत देश आमचा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
- विचारांचं स्वातंत्र्य, विश्वास शब्दांमध्ये अभिमान आत्म्याचा चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूया आपल्या महान राष्ट्राला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
- आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला… ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
- रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा, उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा, जयघोष भारताचा आसमंती गुंजावा सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायु व्हावा, स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
- ना धर्मासाठी जगावे, ना धर्मासाठी मरावे, माणुसकीच धर्म आहे या देशाचा फक्त देशासाठीच जगावे स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
- मुक्त आमचे आकाश सारे झुलती हिरवी राने वने स्वैर उडती पक्षी नभी आनंद आज उरी नांदे… स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
स्वातंत्र्य दिनाचे कोट्स WhatsApp Status ला ठेवा.
- नेताजी सुभाषचंद्र बोस: “स्वातंत्र्यता घेण्याचे नाही तर देण्याचे नाव आहे”
- विनायक दामोदर सावरकर: “एक देव एक देश एक आशा, एक जाती एक जीव एक आशा.”
- लोकमान्य टिळक: “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी तो मिळवणारच.”
- मदन मोहन मालवीय: सत्यमेव जयते
- चंद्रशेखर आजाद: “दुश्मनों की गोलियों का हम सामना करेंगे, आजाद है आजादही रहेंगे”
WhatsApp ला स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा Video कसे डाऊनलोड कराल?
WhatsApp ला जर तुम्हाला एखाद्याला स्वातंत्र्य दिनाच्या Video द्वारे शुभेच्छा द्यायचे असतील तर, तुम्ही तुमच्याकडे आलेले Video फॉरवर्ड करू शकता. याव्यतिरिक्त, तुम्ही इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स ‘YouTube, Insta’ वरील शॉर्ट्स Video डाउनलोड देखील करू शकता.
- हे व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी आधी तुम्हाला व्हीडिओची लिंक कॉपी करावी लागेल.
- त्यानंतर, Google वर जाऊन यु-ट्यूब व्हीडिओ डाऊनलोड किंवा इन्स्टा व्हीडिओ डाउनलोड असे सर्च करा.
- पुढे तुम्हाला स्क्रीनवर मोफत व्हीडिओ डाउनलोड करण्यासाठी अनेक संकेतस्थळ दिसतील.
यासह तुम्ही स्वातंत्र्य दिनासंबंधित व्हीडिओ डाउनलोड करून WhatsApp ला शुभेच्छा पाठवू शकता.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile