इन्कमिंग कॉल्स साठी पण द्यावा लागू शकतो चार्ज, वाचा कारण

इन्कमिंग कॉल्स साठी पण द्यावा लागू शकतो चार्ज, वाचा कारण
HIGHLIGHTS

प्रीपेड सिम युजर्सना आता दर महिन्याला रिचार्ज करावा लागेल. असे न केल्यास त्यांना याची मोठी किंमत द्यावी लागू शकते. कारण नियमित रिचार्ज न केल्यास युजर्सना इन्कमिंग कॉल्स साठी पण चार्ज द्यावा लागू शकतो.

Airtel, Vodafone आणि Idea युजर्सना आता लवकरच एका मिनिमम अमाऊंट ने आपला फोन रिचार्ज करावा लागेल. असे न केल्यास त्यांचं सिम डीएक्टिवेट पण केले जाऊ शकते. हे त्या कस्टमर्स साठी आहे जे प्रीपेड प्लानचा वापर करतात. त्याचबरोबर जर प्रीपेड सिम वापरणारे युजर्सनी दर महिन्याला आपला रिचार्ज केला नाही तर त्यांच्या फोन मध्ये येणारे सर्व इन्कमिंग कॉल्स साठी त्यांना पैसे द्यावे लागू शकतात.

एक वेळ अशी होती जेव्हा प्रीपेड युजर्सना “lifetime validity” चा फायदा मिळत होता आणि यामुळे तेव्हा पोस्ट पेड प्लान्स पेक्षा प्रीपेड प्लान्स महाग असायचे. या खास वॅलेडिटी साठी आपल्याला 6 महिन्यांनी फक्त 10 रुपयांचाच रिचार्ज करावा लागत होता. त्यानंतर स्मार्टफोन्स आल्यानंतर प्रीपेड युजर्स वाढले आणि त्यामुळे आता युजर्सच्या मंथली रिचार्ज वर दिला जात आहे ज्यामुळे त्यांचं सिम एक्टिव राहील. आता मंथली विना रिचार्ज टेलीकॉम कंपन्या युजर्सना फ्री इनकमिंग कॉल्स देणार नाहीत.

युजर रिपोर्ट्स नुसार असे काही कस्टमर्स सोबत होत आहे. एक युजरचे म्हणेन आहे कि कोणत्याही सूचनेविना एयरटेल ने प्रीपेड प्लान्स मध्ये बदल केले आहेत. आउटगोइंग कॉल्स बंद केल्यानंतर दोनदा रिचार्ज केल्यावर पण आउटगोइंग कॉल्स चालू झाले नाहीत, त्यानंतर एयरटेल मध्ये कम्प्लेन केल्यावर युजरला सांगण्यात आले कि पुरेसा बॅलेन्स नसल्यामुळे असे करण्यात आले आहे आणि पुन्हा सुविधा मिळवण्यासाठी त्यांना 35 रुपयांचा रिचार्ज पुन्हा करावा लागेल.

The Mobile Indian च्या रिपोर्ट्स नुसार या बाबतीती Airtel एक्सक्युटीव्ह नायब बाबू सांगतात आहे कि असे युजर्स ज्यांना लो बॅलेन्स सह एका महिन्यापेक्षा जास्त फ्री इन्कमिंग कॉल्सची सुविधा मिळत आहे, त्यांना दर महिन्याला 35 रुपयांचा रिचार्ज करावा लागेल जेणेकरून ते प्लान्सचे सर्व फायदे घेऊ शकतील. त्यांनी सांगितले कि असे न केल्यास 30 दिवसांच्या आतच युजर्सचे आउटगोइंग कॉल्स बंद केले जातील आणि असे केल्याच्या 15 दिवसांच्या आताच इन्कमिंग कॉल्स पण बंद केले जातील. तसेच Airtel युजर्सना  मंथली 35 रुपयांचा रिचार्ज करावा लागेल. कंपनी अजूनही रिचार्ज प्लान्स घेऊन आली आहे ज्यात 65 रुपये आणि 95 रुपयांचे प्लान आहेत जे Tata Docomo च्या प्लान्स प्रमाणेच आहेत.
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo