Comedy Movies: या चित्रपटांमध्ये मिळेल कॉमेडीचा डबल डोज, IMDb वर मिळाले सर्वोच्च रेटिंग

Comedy Movies: या चित्रपटांमध्ये मिळेल कॉमेडीचा डबल डोज, IMDb वर मिळाले सर्वोच्च रेटिंग
HIGHLIGHTS

एव्हरग्रीन कॉमेडी चित्रपटांची यादी बघा

IMDb वर टॉप 5 मध्ये आहेत 'हे' चित्रपट

यादीत पहिल्या क्रमांकावर अमोल पालेकर यांचा 'गोलमाल' चित्रपट

एक चांगला विनोदी चित्रपट थकवा, तणाव आणि डोकेदुखीला क्षणार्धात नाहीसे करतो. बॉलीवूडमध्ये असे अनेक दिग्दर्शक आहेत, ज्यांनी असे उत्तम चित्रपट बनवले आहेत. हे सिनेमे पाहिल्यानंतर कुणीही आपले हसू आवरू शकत नाही. आज आम्ही तुम्हाला अशा टॉप 5 कॉमेडी चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, ज्यांना IMDb वर सर्वाधिक रेटिंग मिळाले आहे.

हे सुद्धा वाचा : 'या' वेबसाइट्स समोर FLIPKART आणि AMAZON फेल, अर्ध्या किमतीत मिळतायेत प्रोडक्ट्स

गोलमाल 

या यादीत क्लासिक कॉमेडी गोलमाल प्रथम क्रमांकावर आहे. 1979 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अमोल पालेकर, बिंदिया गोस्वामी आणि उत्पल दत्त सारखे कलाकार आहेत. हा चित्रपट एक एव्हरग्रीन चित्रपट आहे, जो लोकांना आजही पाहायला आवडतो. चित्रपटाला IMDb वर 8.5 रेटिंग मिळाले आहे.

3 इडियट्स 

आमिर खानच्या सर्वात हिट चित्रपटांपैकी एक, 3 इडियट्स हा 2009 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले होते. या चित्रपटाचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा चित्रपट कितीही वेळा पाहिला तरी कंटाळा येत नाही. चित्रपटाला IMDb वर 8.4 रेट केले आहे.

जाने भी दो यार 

दिग्दर्शक कुंदन शाह यांचा 'जाने भी दो यारों' हा चित्रपट 1983 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात नसीरुद्दीन शाह यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार एकत्र दिसले होते. त्यावेळी हा चित्रपट खूप गाजला होता. चित्रपटाला IMDb वर 8.3 रेटिंग मिळाले आहे.

खोसला का घोसला 

'खोसला का घोसला' चित्रपटाने या यादीत चौथ्या क्रमांकावर आपले स्थान निर्माण केले आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला या चित्रपटातील कहाणी म्हणजे आपले कहाणी वाटते. त्यामुळेच लोकांना हा चित्रपट खूप आवडला. या चित्रपटात अनुपम खेर, बोमन इराणी आणि रणवीर शौरीसारखे कलाकार दिसले होते. सर्व कलाकारांच्या दमदार कामगिरीमुळे, त्याला IMDb वर 8.3 रेटिंग मिळाले आहे.

अंगूर 

क्लासिक कॉमेडीबद्दल बोलत आहोत आणि 'अंगूर' चित्रपटाचे नाव येणार नाही, हे तर शक्यच नाही. संजीव कुमारच्या या चित्रपटात आजच्या काळात लोकांना हसवण्याची ताकद आहे. या चित्रपटात त्यांच्याशिवाय देवेन वर्माही मुख्य भूमिकेत दिसले होते. चित्रपट शेक्सपियरच्या 'कॉमेडी ऑफ एरर्स' या पुस्तकावर आधारित होते. चित्रपटाला IMDb वर 8.3 रेटिंग मिळाले आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo