जर तुमचा स्मार्टफोन चोरी किंवा हरवला असेल, तर फक्त ‘ही’ ट्रीक फॉलो करा आणि फोन परत मिळवा

Updated on 20-Jun-2022
HIGHLIGHTS

हरवलेला स्मार्टफोन आता सहज शोधता येईल

गुगल प्ले स्टोअरवर Find My Device ऍप डाउनलोड करा

पुढीलप्रमाणे ट्रीक स्टेप फॉलो करा

 अनेकदा आपला स्मार्टफोन हरवला किंवा चोरीला जातो. अशा परिस्थितीत लोक खूप अस्वस्थ होतात. कारण स्मार्टफोनमुळे आपली बरीच महत्त्वाची कामे होतात. तर आपल्या फोनमध्ये आपली बरीच माहिती उपलब्ध असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला एका खास ट्रिकबद्दल सांगणार आहोत. या ट्रीकच्या मदतीने तुम्हाला तुमचा चोरीला गेलेला किंवा हरवलेला स्मार्टफोन शोधता येईल शकता. स्मार्टफोन चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास, विलंब न करता ही युक्ती करा. ही युक्ती फॉलो केल्यानंतर, तुमचा हरवलेला किंवा चोरीला गेलेला स्मार्टफोन सापडण्याची शक्यता लक्षणीय वाढते. फोन शोधण्यासाठी तुम्हाला फक्त काही स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. चला तर जाणून घेऊयात या ट्रीकबद्दल सविस्तर माहिती…

हे सुद्धा वाचा :  Amazon वरील 'या' तीन साउंडबारवर मिळतील वेगवेगळ्या किमतीत सर्वोत्तम फीचर्स, बघा ऑफर

फोन चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास, तुम्हाला विलंब न करता दुसरे डिव्हाइस घ्यावे लागेल. यानंतर, दुसऱ्या डिव्हाइसवर Google Play Store वरून Find My Device ऍप डाउनलोड करा. ऍप ओपन झाल्यास Gmail ID वर लॉग इन करावे लागेल, जो तुमच्या चोरीला गेलेल्या किंवा हरवलेल्या स्मार्टफोनमधील लॉगिन होता. 

जर तुमचा स्मार्टफोन चोरीला गेला किंवा हरवला असेल आणि त्याचा GPS चालू असेल. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनला सहज ट्रॅक करता येईल. तुमचा स्मार्टफोन चोरीला गेल्यास फोनशी छेडछाड झाली असेल तर, अशा परिस्थितीत तुमचा मोबाईल फोन मिळण्याची शक्यता खूप कमी होईल. त्यामुळे तुम्हाला ताबडतोब जवळच्या पोलिस ठाण्यात जावे लागेल.

पोलिस स्टेशनला भेट देऊन, तुम्हाला तुमच्या चोरीला गेलेलया किंवा हरवलेल्या स्मार्टफोनचा अहवाल लिहावा लागेल. याशिवाय तुम्हाला तुमचे सिम कार्ड देखील ब्लॉक करावे लागेल. स्मार्टफोन ट्रॅक करण्याची ही ट्रीक फक्त Android मोबाईल फोनसाठी आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :