कमाल आर. खान आपल्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतो.
नुकतेच केआरकेने शाहरुखच्या पठाण या चित्रपटाबद्दल असे काही ट्विट केले.
शाहरुखचा पठाण फ्लॉप झाला नाही तर मी समीक्षा करणे बंद करेन.
बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल आर. खान नेहमीच चर्चेत असतो. अभिनेता सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. कमाल राशिद खानच्या निशाण्यावर इंडस्ट्रीत क्वचितच असा कोणी स्टार असेल, जो त्यांच्यापासून वाचला आहे. तो नेहमीच कुणाला तरी टोमणे मारण्यासाठी चर्चेत राहतो.
तो कधी काय बोलेल याचे काही नेम राहत नाही. कधी तो बॉलिवूड आणि सेलिब्रिटींना टोमणा मारतो, तर कधी अचानक त्याचा दृष्टिकोन बदलतो. अलीकडे केआरकेने शाहरुख खानची माफी सुद्धा मागितली होती आणि त्यानंतरही त्याने अनेक ट्विट केले आहेत. आता नुकतेच केआरकेने शाहरुखच्या पठाण या चित्रपटाबद्दल असे काही ट्विट केले आहे, ज्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे.
कमल आर. खानने ट्विट करत लिहिले की, "शाहरुख खानने शारजाहमध्ये एका मीडिया व्यक्तीला उत्तर देताना म्हटले आहे की, त्याचा पठाण हा चित्रपट सुपरहिट ठरेल! आता मी जगाला वचन देतो की जर पठाण फ्लॉप चित्रपट ठरला नाही, तर मी चित्रपटांचे समीक्षा (पुनरावलोकन) करणे बंद करेन. शाहरुखने जर पठानचे नाव बदलले तर माझे आव्हान स्वीकारले जाणार नाही."
या ट्विटनंतरच केआरकेचा सूर पुन्हा बदलला. त्यानंतर त्याने आणखी एका ट्विटमध्ये लिहिले की, "मी शाहरुखशी सहमत आहो की, त्याचा पठाण हा चित्रपट पाकिस्तान आणि परदेशात हिट होईल."
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.