आयडियाचा हा फ्रीडम पॅक प्रीपेडचा लाभ सर्व उपभोक्ता घेऊ शकतात, ज्या वर्तुळात कंपनीची सेवा उपलब्ध आहे.
मोबाईल ऑपरेटर कंपनी आयडियाने लोकांच्या सुविधेसाठी एक स्वस्त इंटरनेट पॅक आणला आहे. कंपनीने आपल्या कमी किंमतीच्या इंटरनेट पॅकचे नाव ’फ्रीडम पॅक’ ठेवले आहे. ह्याला विशेष करुन प्रीपेड-ग्राहकांसाठी लाँच केले गेले आहे.
आयडिया फ्रीडम पॅक्समध्ये २८ दिवसांच्या वैधतेसह 2G नेटवर्कवर 100 रुपयांत 300MB डेटा आणि 3G नेटवर्कवर 175 रुपयांत 500MB डेटा दिला जाईल.
आयडियाचा हा फ्रीडम पॅक प्रीपेडचा लाभ सर्व उपभोक्ता घेऊ शकतात, ज्या वर्तुळात कंपनीची सेवा उपलब्ध आहे.ह्याविषयी अधिक माहिती देताना आयडिया सेल्युलरचे मुख्य मार्केटिंग ऑफिसर शशि शंकर यांनी सांगितले की, “आयडिया फ्रिडम पॅक्सचे लक्ष्य अशा ग्राहकांसाठी आहे जे एका महिन्यासाठी कोणत्याही अडथळ्याशिवाय डिजिटलशी कनेक्ट राहू इच्छितात आणि ते सुद्धा कमी बजेट पॅकसह.”
कंपनीने आपल्या ह्या पॅकला विद्यार्थ्यांसाठी आणि गृहिणींसाठी खास आणले आहे. खरे पाहता, कंपनीचे असे मत आहे की, इंटरनेटचा वापर विद्यार्थी आणि गृहिणींमध्ये जास्त होताना दिसतो, मात्र त्यांचे बजेट मर्यादितच असते. कमी खर्चात ते जास्तीत जास्त इंटरनेटचा सेवेचा उपयोग करु इच्छितात. त्यांच्या ह्याच गरजांना पाहून आयडियाने कमी बजेटचा हा इंटरनेट पॅक आणला आहे.