हा टॅबलेट 1GHz क्वाड-कोर प्रोसेसर आणि 2GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 64GB पर्यंत वाढवू शकता.
मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी आयबॉलने बाजारात आपला नवीन टॅबलेट स्लाइड कडल 4G सादर केला आहे. कंपनीने आपल्या ह्या टॅबलेटची किंमत ९,९९९ रुपये ठेवली आहे. हा व्हॉइस कॉलिंग टॅबलेट 150MBPS डाउनलोड स्पीडला सपोर्ट करतो.
ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ६.९५ इंचाची डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्युशन 1024×600 पिक्सेल आहे. हा टॅबलेट 1GHz क्वाड-कोर प्रोसेसर आणि 2GB च्या रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 64GB पर्यंत वाढवू शकतो.
ह्यात LED फ्लॅशसह ८ मेगापिक्सेलचा रियर ऑटोफोकस कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा आहे. हा एक ड्यूल सिम ड्यूल स्टँडबाय टॅबलेट आहे. ह्यात कनेक्टिव्हिटीसाठी वायफाय, ब्लूटुथ, 3G, GPRS/एज, GPS आणि मायक्रो-USB फीचर्ससुद्धा आहे. ह्यात USB OTG चा पर्यायसुद्धा आहे.
ह्या टॅबलेटमध्ये २१ क्षेत्रीय भाषांसाठी सपोर्ट आहे. हा आयबॉल स्लाइड कडल 4G मध्ये आपण आसमिया, बंगाली, बोडो, डोंगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोंकणी, मैथिली, मणिपुरी, मल्याळम, मराठी, नेपाळी, उडिया, पंजाबी, संस्कृत, संथाली, सिंधी, तमिळ आणि तेलगू भाषा लिहू तथा वाचू शकता. स्लाइड कडल 4G मध्ये एक रेग्युलर सिम कार्ड आणि एक मायक्रो-सिम कार्डचा वापर केला जाऊ शकतो.