ह्या टॅबलेटमध्ये १३ मेगापिक्सेलचा एक रोटेटिंग कॅमेरा दिला गेला आहे आणि असे पहिल्यांदाच पाहिल जातय की, कोणत्या तरी टॅबलेटला रोटेटिंग कॅमेरा आहे. आतापर्यंत काही स्मार्टफोन्समध्येच रोटेटिंग कॅमेरा दिला गेला आहे.
मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी आयबॉलने भारतीय बाजारात आपला नवीन टॅबलेट स्लाइड एवाँट 7 लाँच केला आहे. कंपनीने ह्याची किंमत १०,९९९ रुपये इतकी ठेवली आहे. ह्या टॅबलेटमध्ये एक रोटेटिंग कॅमेरा दिला आहे आणि असे पहिल्यांदा पाहिले जातय की, कोणता तरी टॅबलेट रोटेटिंग कॅमे-याने सुसज्ज आहे.
जर ह्या टॅबलेटच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ७ इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन १२००x८०० पिक्सेल आहे. त्याचबरोबर ह्यात १.३GHz क्वाड-कोर प्रोसेसर आणि १ जीबीचा रॅमसुद्धा दिला आहे. हा टॅबलेट १६ जीबीच्या अंतर्गत स्टोरेजसह येतो, ज्याला मायक्रो-एसडी कार्डद्वारा ३२ जीबीपर्यंत वाढवले जाऊ शकते.
त्याशिवाय ह्या टॅबलेटमध्ये १३ मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा दिला गेला आहे जो रोटेट होतो आणि हा रियर कॅमेरा आणि फ्रंट फेसिंग कॅमेरा अशा दोन्ही प्रकारे वापरला जाऊ शकतो. आयबॉल स्लाइट एवाँट 7 अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम ४.४ किटकॅटवर चालतो. हा एक ड्युल सिम टॅबलेट आहे. ह्यात व्हिडियो कॉलिंग सेवासुद्धा उपलब्ध आहे. ह्यात २८००mAh ची बॅटरी दिली गेली आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी ह्या टॅबलेटमध्ये वाय-फाय आणि ब्लूटूथशिवाय 3G सपोर्टसुद्धा आहे. आयबॉल स्लाइड एवाँट 7 २१ भारतीय भाषांना सपोर्ट करतो.
काही महिन्यांपूर्वीच आयबॉलने रोटेटिंग कॅमे-यासोबत अँडी एवाँट 5 स्मार्टफोनला बाजारात आणले होते.