हा टॅबलेट 64 बिट 1GHz क्वाड-कोर इंटेल एटम X3 प्रोसेसर आणि 1GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 8GB ची अंतर्गत स्टोरेज आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 64GB पर्यंत वाढवू शकतो.
मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी आयबॉलने आपला नवीन टॅबलेट स्लाइड 3G Q81 बाजारात लाँच केला आहे. हा टॅबलेट जानेवारी महिन्याच्या सुरुवातीली रिटेल स्टोअरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. कंपनीने ह्याची किंमत ७,९९९ रुपये ठेवली आहे.
कंपनीने अशी माहिती दिली आहे की, आयबॉल स्लाइड 3G Q81 टॅबलेट अनेक भाषांना सपोर्ट करतो. यूजर ह्या डिवाइसमध्ये 15 पेक्षा जास्त प्रादेशिक भाषा वाचू आणि लिहू शकतील.
आयबॉल स्लाइड 3G Q81 टॅबलेटच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 8 इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1280×800 पिक्सेल आहे. हा टॅबलेट 64 बिट 1GHz क्वाड-कोर इंटेल एटम X3 प्रोसेसर आणि 1GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 8GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 64GB पर्यंत वाढवू शकतो.
ह्यात ५ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि २ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. हा 4000mAh च्या बॅटरीने सुसज्ज आहे. हा अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम 5.1 लॉलीपॉपवर चालतो.
आयबॉल स्लाइड 3G Q81 सिंगल-सिम डिवाइस आहे आणि इयरफोनच्या माध्यमातून आपण वॉइस कॉलिंग फीचरचासुद्धा आनंद घेऊ शकता. ह्या टॅबलेटमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात 3G,GPRS/एज, GPS/A-GPS, वायफाय आणि मायक्रो-USB वैशिष्ट्य आहे. हा USB OTG फंक्शनलासुद्धा सपोर्ट करेल.