हा टॅबलेट 1.2GHz इंटेल एटम ३ प्रोसेसर आणि 1GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 8GB चे अंतर्गत स्टोरेज आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो.
मोबाईल निर्माता कंपनी आयबॉलने आपला नवीन टॅबलेट स्लाइड 3G Q45i बाजारात आणला आहे. कंपनीने आपल्या ह्या व्हॉइश कॉलिंग टॅबलेटची किंमत ५,९९९ रुपये ठेवली आहे. हा टॅबलेट ऑनलाइन रिटेल साइटवर उपलब्ध आहे.
जर आयबॉल स्लाइड 3G Q45i टॅबलेटच्या वैशिष्ट्याविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 7 इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1024×600 पिक्सेल आहे. हा टॅबलेट 1GHz इंटेल एटम X3 प्रोसेसर आणि 1GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 8GB चे अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो.
आयबॉल स्लाइड 3G Q45i टॅबलेटमध्ये LED फ्लॅशसह २ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि फ्रंटमध्ये एक VGA कॅमेरा दिला आहे. हा एक ड्यूल सिम टॅबलेट व्हॉइस कॉलिंग फीचरने सुसज्ज आहे. हा आउट ऑफ बॉक्स अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात 3G, वायफाय, ब्लूटुथ, USB OTG, GPS, A-GPS, FM रेडियो आणि मायक्रो-USB फीचर दिले आहे. डिवाइसमध्ये कास्ट स्क्रीन टेक्नॉलॉजीसह अनेक भाषांचा कीबोर्ड आहे.
आयबॉलने ह्या महिन्यात भारतात आणखी दोन टॅबलेट लाँच केले होते. आयबॉल स्लाइढ 3G Q81 आणि कडल 4G स्मार्टफोन क्रमश: ७,९९९ रुपये आणि ९,९९९ रुपयांत लाँच केले होते.