OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime ने त्याच्या पुढील वेब सिरीज Hush-Hush चा ट्रेलर लाँच केला आहे. या सिरीजमधून अभिनेत्री जुही चावला आणि आयशा जुल्का OTT वर पदार्पण करणार आहेत. हुश हुश ही वेब सिरीज 22 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. आजकाल बहुतेक बॉलीवूड सेलिब्रिटी OTT प्लॅटफॉर्मकडे वळताना दिसत आहेत.
हे सुद्धा वाचा : iPhone 14 Series : या वेबसाइटवर उत्तम ऑफर उपलब्ध, मिळेल 5000 रुपयांचा कॅशबॅक
OTT च्या जगात दहशत निर्माण करण्यासाठी Amazon Prime लवकरच आपल्या नवीन सिरीजसह येत आहे. या सिरीजमध्ये अभिनेत्री जुही चावलासोबत कृतिका कामरा, सोहा अली खान, आयशा जुल्का, शहाना गोस्वामी, करिश्मा तन्ना दिसणार आहेत. 2 मिनिट 6 सेकंदाच्या ट्रेलरमध्ये सस्पेन्स आणि भरपूर ड्रामा पाहायला मिळणार आहे. या सिरीजमधील बहुतेक संवाद राष्ट्रीय पुरस्कार विजेती जुही चतुर्वेदी म्हणजेच 'गुलाबो सिताबो', 'पिकू' चित्रपटाची लेखिका हिने लिहिले आहेत. 2 मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये चार मैत्रिणींची कहाणी दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या सिरीजमध्ये अभिनेत्री करिश्मा तन्ना पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.
या चार मैत्रिणींच्या आयुष्यात एके दिवशी ही घटना घडते, त्यानंतर त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाते. जुही चावला पावरफुल लॉबीस्ट ईशी संघमित्रा, सोहा अली खान जर्नलिस्टच्या सायबा त्यागीच्या भूमिकेत, शहाना गोस्वामी सेल्फ-मेड फॅशन डिझायनर झायरा शेख आणि डॉली दलालच्या भूमिकेत कृतिका कामरा हे आहेत.
तिच्या OTT पदार्पणाबद्दल बोलताना, जुही चावला म्हणाली," प्राइम व्हिडिओसह वाढत्या डिजिटल स्पेसमधील माझ्या प्रवासाबद्दल मी खूप उत्साहित आहे, OTT प्लॅटफॉर्मच्या आगमनानंतर कथा सांगण्याची पद्धत खूप बदलली आहे. Hush-Hush या कथानकाबद्दल जाणून घेतल्यावर मला या कथेचा एक भाग व्हायला हवे असे वाटले."