कंपनीने ऑनर T1 टॅबलेटची किंमत ६,९९९ रुपये आहे. हा ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट आणि hihonor.com वर विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.
हुआवेने आज भारतीय बाजारात आपले दोन नवीन डिवाइस लाँच केले. कंपनीने ऑनर 5C स्मार्टफोनसह आपला नवीन टॅबलेट ऑनर T1 लाँच केला. कंपनीने ऑनर T1 टॅबलेटची किंमत ६,९९९ रुपये ठेवली आहे. हा ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट आणि hihonor.com वर विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.
ऑनर T1 टॅबलेटमध्ये ७ इंचाची डिस्प्ले दिली आहे. ह्याचे डिस्प्ले रिझोल्युशन 1280×800 पिक्सेल आहे. हा डिवाइस 1.2GHz क्वाड-कोर प्रोसेसरने सुसज्ज आहे. ह्यात 1GB ची रॅम देण्यात आली आहे.
ह्यात 8GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे. हा 4800mAh च्या बॅटरीने सुसज्ज आहे. ह्यात 5 MP चा रियर कॅमेरा आणि 0.3 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. हा टॅबलेट अॅनड्रॉईड किटकॅट v4.4 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.