काय आहे WhatsApp Communities फिचर ? जाणून घ्या ‘कशा’प्रकारे वापराल नवे फीचर…
WhatsApp Communities हे नवीन फिचर नक्की काय ?
नवीन फीचरचा उद्देश वापरकर्त्यांना व्हॉट्सऍपवर त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या ग्रुपशी कनेक्ट होण्यास मदत करणे होय.
WhatsApp कम्युनिटी तयार करण्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया बघा
काही आठवड्यांपूर्वी WhatsApp Communities फिचरची घोषणा केल्यानंतर, व्हॉट्सऍप आता Android, iOS आणि वेब वापरकर्त्यांसाठी कम्युनिटी आणत आहे. नवीन फीचरचा उद्देश वापरकर्त्यांना व्हॉट्सऍपवर त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या ग्रुपशी कनेक्ट होण्यास मदत करणे आहे. ग्रुप्सबद्दल बोलताना, मेटाचे CEO मार्क झुकेरबर्ग म्हणाले, "आज आम्ही तुमच्यासोबत व्हॉट्सऍपवर Communities नावाचे एक नवीन फिचर सामायिक करण्यास उत्सुक आहोत. "
हे सुद्धा वाचा : अजयच्या Drishyam 2 ला मिळतोय भरभरून प्रतिसाद, जाणून घ्या पब्लिक रिऍक्शन
WhatsApp Communities म्हणजे काय ?
व्हॉट्सऍप कम्युनिटी हे जवळपास ग्रुपसारखेच असतात, परंतु तुम्हाला अधिक लोकांना जोडण्याची परवानगी देतात. उदाहरणार्थ, WhatsApp ग्रुप वापरकर्त्यांना समान संभाषणात गुंतण्यास मदत करतात, तर WhatsApp कम्युनिटीमध्ये तुम्हाला एकाच छताखाली सारख्या इंटरेस्टच्या ग्रुपना एकत्र आणण्याची परवानगी मिळते. ज्याद्वारे तुम्ही तुमच्या शाळा, परिसर, शिबिरे इत्यादींशी सहज कनेक्ट करू शकता.
iOS वापरकर्त्यांसाठी, कम्युनिटी टॅब चॅट सेटिंग्ज पर्यायाच्या बाजूला दिसतो. तर WhatsApp वेबवर, तुम्हाला तुमच्या स्क्रीनच्या वरच्या उजव्या बाजूला कम्युनिटी सापडेल.
WhatsApp कम्युनिटी तयार करण्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया बघा
> तुमच्या WhatsApp वर कम्युनिटी टॅबवर क्लिक करा.
> कम्युनिटीचे नाव, तपशील आणि प्रोफाइल फोटो टाका. कम्युनिटीचे नाव 24 वर्णांपेक्षा जास्त नसावे. कसली कम्युनिटी आहे, हे तुमच्या तपशीलाने कम्युनिटीला कळायला हवे.
> कम्युनिटी जॉईन केल्यानंतर, वापरकर्ता इच्छित असल्यास सहजपणे एका ग्रुपमधून दुसऱ्या ग्रुपमध्ये जाऊ शकतो.
कम्युनिटी व्यतिरिक्त, व्हॉट्सऍपने इतर काही फीचर्स देखील सुरू केली आहेत. कंपनीने चॅटमध्ये पोलिंग, 32 लोकांसह व्हिडिओ कॉलिंग आणि 1024 वापरकर्त्यांना ग्रुपमध्ये जोडणे यासारखे फीचर्सही दिले आहेत. त्यामुळे यूजर्सना आता व्हॉट्सऍपवर उत्तम सुविधा मिळणार आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile