Google Bard चा वापर कसे कराल ? बघा पॉईंट टू पॉईंट सोपी प्रक्रिया

Google Bard चा वापर कसे कराल ? बघा पॉईंट टू पॉईंट सोपी प्रक्रिया
HIGHLIGHTS

Google चे AI चॅटबॉट Bard बाजारात दाखल

बार्डचे ओपन ऍक्सेस 180 हून अधिक देशांमध्ये उपलब्ध असणार आहे.

तुम्हाला https://bard.google.com वर जावे लागेल.

OpenAI च्या ChatGPT जबरदस्त टक्कर देण्यासाठी Google चे AI चॅटबॉट Bard बाजारात दाखल झाले आहे. याआधी, बार्ड वापरण्यासाठी वेटिंग लिस्टमध्ये सामील व्हावे लागत होते. Google Bard सुरुवातीला फक्त काही देशांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले. आता गुगल इव्हेंटमध्ये कंपनीने जाहीर केले आहे की, बार्डचे ओपन ऍक्सेस 180 हून अधिक देशांमध्ये उपलब्ध असणार आहे. 

वेटिंग लिस्ट काढून टाकण्यावर आणि Google Bard वर ऍक्सेस देण्यावर कंपनीने म्हटले की, "अधिकाधिक लोकांनी Bard वापरून पहावे आणि आम्हाला अभिप्राय द्यावा. जेणेकरून आम्हाला या AI चॅटबॉटमध्ये सुधारणा करून त्यात नवीन फीचर्स जोडता यावे."

 40 हून अधिक भाषा

कंपनीचा हा AI चॅटबॉट 40 हून अधिक भाषांना सपोर्ट करेल. हे कंपनीच्या नवीनतम भाषा मॉडेल PaLM 2 द्वारे समर्थित आहे. या भाषा मॉडेलवर स्विच करण्यामागील कारण म्हणजे बार्डची कोडिंग क्षमता, ऍडव्हान्स इ. सुधारणे होय. 

 पॉईंट टू पॉईंट सोपी प्रक्रिया 

– सर्वप्रथम तुम्हाला https://bard.google.com वर जावे लागेल.

– आता तुम्हाला Google खात्याने साइन इन करावे लागेल.

– साइन इन केल्यानंतर, स्क्रीनवर Try Me पर्याय मिळेल.

– आता Google Bard च्या गोपनीयता धोरणाशी सहमती द्या.

– तुम्ही Agree वर क्लिक करताच म्हणजे तुमची सहमती देताच Google Bard मोफत वापरण्यास सक्षम असाल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo