आता इंटरनेटशिवाय वापरता येईल Gmail, फक्त वाचताच नाही तर पाठवता देखील येतील ईमेल्स, कसे ते जाणून घ्या…
ग्राहकांच्या सोयीसाठी Gmail वर आली नवी सुविधा
आता इंटरनेटशिवाय वापरता येईल Gmail
ऑफलाईन मोडमध्ये पाठवता येतील इमेल्स
आता तुम्हाला इंटरनेटशिवाय Gmail वापरता येणार आहे. Gmail भारतासह जगभरातील वापरकर्ते वापरतात. अशा परिस्थितीत ही सुविधा लाखो वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्हाला ऑफलाइन मोडमध्ये Gmail वर ईमेल वाचता येईल, उत्तर देता येईल आणि सर्च देखील करता येईल.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, Gmail ऑफलाइन वापरण्यासाठी, Chrome मध्ये mail.google.com बुकमार्क करण्याचा सल्ला दिला जातो. तसेच, तुम्ही ऑफिस किंवा शाळेच्या अकाउंटसह Gmail वापरत असल्यास, तुम्हाला तुमच्या अॅडमिनला सेटिंग बदलण्यास सांगावे लागेल. चला तर जाणून घेऊयात, ऑफलाइन मोडमध्ये Gmail कसे वापरावे:
हे सुद्धा वाचा : BSNL RECHARGE : दररोज 5.5 रुपयांपेक्षा कमी खर्चात 365 दिवसांचा प्लॅन, मिळेल 600 GB डेटासह मोफत कॉलिंग
ऑफलाइन मोड अशाप्रकारे इनेबल करा
1. सर्वप्रथम तुमच्या कॉम्प्युटरमध्ये क्रोम ब्राउझर डाउनलोड करणे आवश्यक आहे. तुम्ही केवळ Chrome विंडोमध्ये Gmail ऑफलाइन वापरू शकता, Incognito मोडमध्ये नाही.
2. Gmail ऑफलाइन सेटिंग्जवर जा किंवा लिंकवर क्लिक करा- https://mail.google.com/mail/u/0/#settings/offline
3. "Enable offline mail" बघा.
4. तुमची सेटिंग निवडा, जसे की तुम्हाला किती दिवसांचे मेल सिंक करायचे आहेत.
5. Save changes वर क्लिक करा.
Gmail ऑफलाइन कसे वापरावे ?
1. तुम्ही इंटरनेटशी कनेक्ट नसताना Gmail वापरण्यासाठी, तुम्हाला mail.google.com वर जावे लागेल.
2. किंवा Chrome मध्ये Gmail ऑफलाइनसाठी तयार केलेल्या बुकमार्कवर क्लिक करा.
3. लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही ऑफलाइन ईमेल पाठवता, तेव्हा तुमचा ईमेल नवीन "आउटबॉक्स" फोल्डरमध्ये हलविला जातो आणि तुम्ही परत ऑनलाइन होताच मेल निघून जातो.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile