ChatGPT कसे वापरावे? अगदी सोप्या भाषेत जाणून घ्या पद्धत

ChatGPT कसे वापरावे? अगदी सोप्या भाषेत जाणून घ्या पद्धत
HIGHLIGHTS

ChatGPT वापरण्याची पद्धत अगदी सोपी

स्टेप बाय स्टेप अगदी सोपी प्रक्रिया बघा

ChatGPT शी स्पर्धा करेल Google bard

सध्या ChatGPT ची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहेत. आधी त्याचे लाँचिंग, नंतर त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आणि आता वापरकर्त्यांच्या लीक झालेल्या तपशीलांमुळे हे प्रगत AI टूल चर्चेत राहिले आहे. ChatGPT हे एक प्रकारचे सर्च इंजिन आहे. या सर्च इंजिनवर तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर अगदी अचूकपणे मिळाले आहे. 

ChatGPT ची हिच कॉलिटी याला Google पेक्षा वेगळे आणि अनोखे बनवते. आत्तापर्यंत लाखो लोकांनी हे प्रगत AI साधन वापरले असेल. परंतु तरीही असे काही लोक असतील, ज्यांना ते कसे वापरावे हे माहित नसल्यामुळे ते आतापर्यंत वापरलेले नसेल. तर काळजी करू नका या लेखात आम्ही अगदी सोप्या भाषेत ही नवीन टेक्नलॉजी कशी वापरावी, ते सांगणार आहोत. 

ChatGPT चा वापर कसा करावा ? 

1. ChatGPT वापरण्यासाठी, तुम्हाला प्रथम Google Chrome किंवा Mozilla Firefox मध्ये chat.openai.com ओपन करणे आवश्यक आहे.

2.  यानंतर, येथे तुमच्या ईमेल आयडी किंवा मोबाइल नंबरसह लॉग इन करा.

3. आता तुम्हाला तुमचे प्रोफाइल नाव येथे टाकावे लागेल.

4. येथे तुम्ही तुमच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर विचारू शकता. प्रतिसादात, तुम्हाला Google सारखे 10 दुवे मिळणार नाहीत, परंतु एक अचूक मानवी उत्तर मिळेल.

ChatGPT शी स्पर्धा करेल Google bard

अमेरिकन टेक कंपनी गुगलने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित चॅट सॉफ्टवेअर Bard सादर केले आहे. गुगलचा नवीन एआय चॅटबॉट मायक्रोसॉफ्टच्या सपोर्टेड ChatGPT स्पर्धा करेल. नोव्हेंबर 2022 मध्ये लाँच झालेल्या ChatGPT चॅटबॉटने संपूर्ण जगाला वेड लावले आहे. ChatGPT च्या धोक्याचा सामना करण्यासाठी, Google ने चॅटबॉट सेवा देखील सुरू करण्याची योजना आखली आहे. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo