लॉकडाऊनच्या काळापासून काम करण्याच्या पद्धती बदललेल्या आहेत. होय, या काळात एक नवीन आणि लोकप्रिय पद्धत पुढे आली आहे. त्यापैकी एक ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धत आणि ‘हायब्रिड’ पद्धत आहे. यासाठी, सध्या लोक ऑफिसमध्ये आणि घरी देखील Wi-Fi चा वापर करत आहेत. त्यामुळे, वाय-फाय इंटरनेट हा लोकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे.
हे सुद्धा वाचा: लाँचपूर्वीच OnePlus 12 चा Attractive फर्स्ट लुक आला समोर, फोटोग्राफीसाठी ठरेल उत्तम पर्याय। Tech News
जर तुम्ही स्मार्टफोन वापरत असाल तर Wi-Fi कॉलिंगचे नाव तुम्ही ऐकले असेलच. वाय-फाय कॉलिंग आता खूप सामान्य झाले आहे. तुम्हाला ते सर्व स्मार्टफोनमध्ये मिळेल, पण अनेकांना याची कल्पना नाही. चला तर मग आजच्या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला फोनमध्ये Wi-Fi कॉलिंग कसे सक्षम करावे? याबाबत माहिती देणार आहोत.
लक्षात घ्या की, सर्व फोन्समध्ये ही सेटिंग वेगवेगळी असेल. साधारणतः Wi-Fi कॉलिंगचे फिचर कॉलिंग फोन App आणि नेटवर्कच्या ऍडवान्स सेटिंग्जमध्ये उपलब्ध असेल.