Android वरून iOS वर WhatsApp डेटा कसा ट्रान्सफर करायचा? बघा अगदी सोपा मार्ग

Android वरून iOS वर WhatsApp डेटा कसा ट्रान्सफर करायचा? बघा अगदी सोपा मार्ग
HIGHLIGHTS

WhatsApp डेटा अँड्रॉइड ते iOS डिव्हाइसवर ट्रान्सफर करा.

तुम्हाला Move to iOS नावाचे ऍप डाउनलोड करावे लागेल.

डेटा ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया आणि महत्त्वाच्या बाबी बघा.

नवीन स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर फोनचा ऍप डेटा ट्रान्सफर करणे हे खूप अवघड काम आहे. तसे, Android टू Android आणि iPhone टू iPhone डेटा ट्रान्सफर करण्यात कोणतीही अडचण नाही. पण जर तुम्ही फोन Android वरून iPhoneवर अपग्रेड करत असाल, तर डेटा ट्रान्सफर ही सर्वात मोठी समस्या तुमच्या पुढे असते. तुम्ही देखील Android वरून iPhone वर अपडेट करत असाल तर हा अहवाल खास तुमच्यासाठी आहे. या लेखात आज आम्ही तुम्हाला काही सोप्या पद्धती सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्हाला कोणत्याही अडचणीशिवाय WhatsApp डेटा ट्रान्सफर करता येईल.

हे सुद्धा वाचा : परवडणाऱ्या किमतीत JIOBOOK ची विक्री झाली सुरु, जाणून घ्या किंमत आणि सर्व जबरदस्त फीचर्स

 प्रोफाईल फोटो, चॅट्स, चॅट हिस्ट्री, मीडिया आणि व्हॉट्सऍप सेटिंग्ज अँड्रॉइडवरून आयफोनमध्ये ट्रान्सफर करण्याचे काही सोपे मार्ग आहेत. पण कॉल हिस्ट्री आणि डिस्प्ले नाव ट्रान्सफर करता येत नाही. बघुयात संपूर्ण प्रक्रिया… 

WhatsApp मधील डेटा अँड्रॉइडवरून आयफोनवर कसे ट्रान्सफर करावे ?  

> अँड्रॉइड फोनवरून iOS वर WhatsApp डेटा ट्रान्सफर करण्यासाठी, तुम्हाला Move to iOS नावाचे ऍप डाउनलोड करावे लागेल. या डेटा ट्रान्सफरसाठी तुम्हाला कोणत्याही केबलची गरज भासणार नाही, म्हणजेच तुम्हाला पूर्णपणे वायरलेस पद्धतीने डेटा ट्रान्सफर करता येईल. पण यासाठी तुम्हाला Wi-Fi नेटवर्कची आवश्यकता असेल. 

> यानंतर, तुमच्या अँड्रॉइड फोनवर Move to iOS ऍप उघडा आणि स्क्रीनवरील कोड नवीन iPhone वर दाखवलेल्या कोडशी मॅच करा.

> आता Continue वर क्लिक करा. त्यानंतर WhatsApp डेटाच्या ऑप्शनवर क्लिक करा.

> आता पुन्हा मूव्ह टू iOS वर या आणि ट्रान्सफर ऑप्शनवर क्लिक करा. 

> यानंतर तुमचे व्हॉट्सऍप डेटा ट्रान्सफर सुरू होईल. डेटा ट्रान्सफर केल्यानंतर, तुम्हाला एक कन्फर्मेशन मॅसेज देखील मिळेल.

काही लक्षात घेण्यासारखी गोष्टी…  

– डेटा ट्रान्सफर करण्यासाठी, तुमच्या Android डिव्हाइसवर Android 5 किंवा हाय वर्जन असणे आवश्यक आहे. 

– तुम्हाला नवीन आयफोन मिळाल्यास आणि तुमच्याकडे Apple आयडी नसल्यास, तुम्हाला आयडी तयार करणे आवश्यक आहे. 

– अँड्रॉइड आणि  iOS डिव्‍हाइसमध्‍ये डेटा ट्रान्स्फर करण्‍यासाठी, त्‍याच मोबाईल नंबरची आवश्‍यकता असेल, जो Android मध्‍ये वापरला जात आहे. 

– दोन्ही उपकरणे एकाच नेटवर्कशी कनेक्ट केलेली असणे आवश्यक आहे.

– या चॅट ट्रान्सफरमध्ये फक्त तुमच्या WhatsApp चा डेटा येईल. गुगल ड्राइव्हवर बॅकअप असेल तर तो मात्र ट्रान्सफर करता येणार नाही.

– iOS डिव्हाइस नवीन असणे किंवा डेटा ट्रान्सफरसाठी Factory Reset करणे खूप महत्वाचे आहे. 

 या सर्व अटी लक्षात घेऊन, तुम्ही Android वरून iOS डिव्हाइसवर WhatsApp डेटा ट्रान्सफर करू शकता. कोणतीही अट पूर्ण न केल्यास, तुम्हाला डेटा ट्रान्सफर करण्यात अडचणी येतील.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo