महिलांची मासिक पाळी ट्रॅक करणारी अशी अनेक स्मार्टवॉचेस आणि मोबाईल ऍप्स सध्या बाजारात उपलब्ध आहेत. पण हे काम तुम्ही WhatsAppच्या माध्यमातूनही करू शकता. Sirona या फेमिनीन हायजिन कंपनीने महिलांच्या मासिक पाळीचा मागोवा घेण्यासाठी देशातील पहिला मासिक पाळी ट्रॅकर WhatsApp वर तयार केला आहे. व्हॉट्सऍपद्वारे ट्रॅकिंग सोपे करण्यासाठी सिरोनाने AI आधारित तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे.
हे सुद्धा वाचा : खरंच ! यावेळी फेस्टिव्ह सिझनमध्ये असेल खरी धमाल, स्मार्टफोन्सवर मिळेल बम्पर डिस्काउंट
विशेष बाब म्हणजे पीरियडचा मागोवा घेण्यासोबतच तुम्ही गर्भधारणा आणि गर्भधारणा टाळण्यासाठी देखील त्याची मदत घेऊ शकता. ते वापरण्याची पद्धत देखील खूप सोपी आहे. तुम्हाला फक्त एका नंबरवर WhatsApp मेसेजमध्ये हाय टाइप करावे लागेल आणि पुढील प्रक्रियेचे अनुसरण करावे लागेल. चला तर मग जाणून घेऊया व्हॉट्सऍपवर पीरियड्स कसे ट्रॅक करायचे:
– 9718866644 हा क्रमांक तुमच्या फोनमध्ये सेव्ह करा
– आता व्हॉट्सऍपवर जा आणि या नंबरवर "Hi" पाठवा
– प्रतिसादात तुम्हाला एक यादी पाठवली जाईल.
-पिरियड्स ट्रॅक करण्यासाठी, "Period tracker" टाइप करून उत्तर द्या.
– त्यानंतर तुम्हाला तुमच्या मासिक पाळीचा तपशील द्यावा लागेल.
– येथे तुम्हाला ओव्हुलेशन तपशील, फर्टलाईट विंडो, नेक्स्ट पिरियड, शेवटचे पिरियड यांसारखे तपशील विचारले जातील.
– वापरकर्त्यांना त्यांचा पिरियड आणि मागील पिरियडबद्दल माहिती देण्यास सांगितले जाईल. चॅटबॉट याबाबत नोंद ठेवेल आणि वापरकर्त्यांना भविष्यातील पिरियड्सबद्दल सतर्क करेल.