तुमचे फेसबुक अकाउंट हॅक होण्यापासून कसे रोखाल?

तुमचे फेसबुक अकाउंट हॅक होण्यापासून कसे रोखाल?
HIGHLIGHTS

सध्या फेसबुक अकाउंट हॅक होण्याच्या समस्या वाढत चालल्या असून ते हॅक होण्यापासून कसे थांबवाल, यासाठी ह्या काही विशेष युक्त्या सांगण्यात आल्या आहेत. त्या अमलात आणल्यास नक्कीच तुमचे फेसबुक अकाउंट हॅक होण्यापासून वाचू शकेल.

आपले सोशल नेटवर्किंग वाढवण्याच्या दृष्टिकोनातून निर्माण करण्यात आलेल्या अनेक सोशल मिडिया साइट्सचा वापरही दिवसेंदिवस तितकाच वाढत जाताना दिसत आहे. ह्यात फेसबुक, ट्विटर यांसारख्या अनेक सोशल साइट्सचा समावेश आहे. पण ह्या सोशल वेबसाइटचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत की…. त्यातील सर्वात मोठा तोटा म्हणजे तुमचे अकाउंट हॅक करुन त्याचा गैरवापर करणे. ह्या गंभीर प्रश्नाची झळ सर्वात जास्त सहन करावी लागतेय ती फेसबुक यूजर्सना. आमच्याकडे अनेक यूजर्सनी याविषयी विचारले, त्यामुळे आम्ही ह्यावर तोडगा म्हणून अशा काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या साहाय्याने आपण आपले फेसबुक खाते हॅक होण्यापासून रोखू शकाल.

 

सर्वात आधी आपण माहित करुन घेऊया फेसबुक हॅक होण्याची महत्त्वाची कारणे:

ह्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे फेसबुकला म्हणावी तितके सशक्त अशी प्रायव्हसी सुरक्षा नाही. पण ह्यासाठी आपण फेसबुकला दोष न देता कुठे ना कुठे फेसबुक हॅक होण्याच्या समस्येला आपणच प्रोत्साहन देताय, हे आम्ही येथे ठामपणे आपणास सांगू. असे सांगण्यामागचे कारण म्हणजे तुम्ही सतत वापरणारे निरनिराळे अॅप्स, गेम्स जेथे तुम्हाला असंख्य विचित्र प्रश्न विचारले जातात. उदा. ‘तुम्ही कधी मरणार’, ‘तुम्हाला तुमचा जोडीदार कधी भेटणार’ इ.

पण खरे सांगायचे म्हणजे असे गेम्स, अॅप्स हे योग्यरित्या संरक्षित केलेले नसून उलट ते तुमचे अकाउंट हॅक करण्याच्या प्रश्नाला खतपाणीच घालतात. त्यामुळे सर्वात आधी तुम्ही अशा गेम्सला किंवा अॅप्स बळी न पडता ह्यांचा कमीत कमी वापर करावा अथवा केलेच नाही तर उत्तमच. कारण ह्या अॅप्स, गेम्सच्या माध्यमातून अगदी सहजपणे तुमची खाजगी माहिती हॅक केली जाऊ शकते.

 

पण जर तुम्ही हे गेम्स, अॅप्स वापरले असतील तर त्यासाठी काही सोप्या टिप्स आम्ही येथे दिल्या आहेत.  

  • जर तुम्हाला असे वाटत असेल की, तुमचे अकाउंट हॅक झाले असेल, तर सर्वात आधी तुम्ही तुमच्या फेसबुक खात्याचा पासवर्ड त्वरित बदला. पण हे जरुरी नाही की प्रत्येक वेळी पासवर्ड बदलून तुम्ही तुमचे अकाउंट हॅक होण्यापासून रोखू शकाल, पण तातडीचा पर्याय म्हणून हे नक्की करुन पाहा.

  • तुमचे फेसबुक पेज उघडल्यावर डाव्या बाजूला असलेल्या न्यूजफीड पेजचा वापर करा,

  • तेथे तुम्हाला अनेक मेनू दिसतील, उदा. अॅप्स, फ्रेंड्स, ग्रुप्स. इ.

  • त्यातील प्रत्येक पर्यायाच्या बाजूला तुम्हाला’More’ पर्याय दिसेल.

  • त्यातील Apps मेनूच्या More पर्यायावर क्लिक करा.

  • तेथे तुम्हाला संपूर्ण अॅप्सची यादी पाहायला मिळेल, त्या प्रत्येक अॅप्सला तुम्हाला ३ पर्याय दिसतील. Add to favourite, Edit & Remove.

  • त्यातील वापरात नसलेले अॅप्स रिमूव्ह करा.

  • तसेच त्यातील असा एखादा अॅप तुम्हाला आवडला असेल, उदा. ‘who is your best friend’ इत्यादी. तर त्यासाठी तुम्ही permissions एडिट करु शकता. जेणेकरुन तुमची अन्य खाजगी माहिती त्यांना दिसणार नाही.

निरर्थक असलेल्या टॅग्सचे काय कराल?

तुम्हाला कोणत्या निरर्थक अशा पोस्टमध्ये टॅक केले असेल, उदा. ‘Sex or Sexy lingerie’, तर सर्वप्रथम तुम्ही तुमची टॅग सेटिंग बदला. त्यामुळे कोणीही तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या नावाचा उल्लेख करणार नाही.

हे कसे कराल?

  • तुमच्या मुख्य फेसबुक पेजवर वरती उजव्या बाजूला असलेल्या बाणावर क्लिक करुन Settings निवडा.

  • त्यानंतर डाव्या बाजूला असलेल्या पर्यायांपैकी Timeline & tagging निवडा.

  • “Review posts friends tag you in before they appear on your timeline?” हा पर्याय Enable करा. त्यामुळे जर तुम्हाला कोणी त्यांच्या फोटो किंवा पोस्टमध्ये टॅग केले तर त्याची पुर्व सूचना फेसबुक तुम्हाला वेळोवेळी देईल.

तर ह्या होत्या अगदी सोप्या पण खूप महत्त्वाच्या टिप्स, ज्या तुम्हाला तुमचे फेसबुक अकाउंट हॅक करण्यापासून रोखू शकतील.

हेदेखील वाचा – व्हॉट्सअपने पाठ फिरवल्यानंतर आता ब्लॅकबेरी BBM ला आणणार नव्या रुपात

हेदेखील वाचा – फेसबुकने लाँच केला आपला नवीन इमोशन ऑप्शन

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo