Meta आणि Jio प्लॅटफॉर्मने WhatsApp वर एंड-टू-एंड शॉपिंग अनुभव देण्यासाठी JioMart सोबत भागीदारी केली आहे. खरेदीदार आता ऍपच्या किराणा मालाच्या कॅटलॉगमधून फूड आयटम निवडू शकतील, त्यांना कार्टमध्ये ऍड करू शकतील आणि WhatsApp चॅट न सोडता JioMart वर पेमेंट करू शकतील. तुम्हालाही JIO च्या या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल, सोपी प्रक्रिया बघा…
हे सुद्धा वाचा : दीर्घ प्रतीक्षेनंतर SONY चा नवा स्मार्टफोन बाजारात दाखल, मिळेल उत्तम कॅमेरा आणि डिस्प्ले
स्टेप 1: सर्व प्रथम WhatsApp उघडा आणि JioMart क्रमांक 7977079770 वर "Hi" पाठवा.
स्टेप 2: आता तुम्हाला "Get Started" पर्यायासह अभिनंदन संदेश दिसेल.
स्टेप 3: आता "View Catalogue" वर टॅप करा.
स्टेप 4: आता तुमचा पिन कोड प्रविष्ट करा.
स्टेप 5: आता तुम्ही फळे आणि भाज्या, पेय पदार्थ, सेल्फ केअर, मॉम आणि बेबी केअर यांसारख्या कॅटेगरीज ब्राउझ करू शकता आणि प्रोडक्ट पाहू शकता.
स्टेप 6: आता तुमची आवडती वस्तू कार्टमध्ये जोडण्यासाठी, "+" चिन्हावर टॅप करा.
स्टेप 7: प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, तुम्ही वरच्या उजव्या कोपर्यात असलेल्या कार्ट चिन्हावर टॅप करून कार्टवर जाऊ शकता किंवा स्क्रीनच्या तळाशी असलेल्या "View Cart" ऑप्शनवर टॅप करू शकता.
स्टेप 8: सूचित केल्यावर, तुम्ही आता तुमचा पत्ता देऊ शकता आणि कॅश ऑन डिलिव्हरी, पेमेंट ऑन जिओमार्ट, पेमेंट ऑन व्हॉट्सऍप यासारखे पेमेंट मोड निवडू शकता.
फक्त पेमेंट करा आणि काम झाले. आता तुमचे सामान तुमच्या पत्त्यावर पोहोचेल. ग्राहक व्हॉट्सऍपवरील JioMart कॅटलॉग इतरांसोबत शेअर करू शकतात.