मस्तच ! टाईप न करता WhatsAppवर मॅसेज पाठवा, चला तुम्ही देखील लगेच ट्राय करून बघा

मस्तच ! टाईप न करता WhatsAppवर मॅसेज पाठवा,  चला तुम्ही देखील लगेच ट्राय करून बघा
HIGHLIGHTS

WhatsAppवर टाईप न करता मॅसेज पाठवा

Android स्मार्टफोनच्या व्हॉइस रेकग्निशन सपोर्टमुळे असे करणे शक्य

ही युक्ती लगेच ट्राय करा

आज आम्ही तुम्हाला एक अशी जादूची युक्ती सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्हाला WhatsApp टाइप न करता तुमच्या संपर्कांना मॅसेज पाठवता येईल. खरं तर, अँड्रॉइड आपल्या वापरकर्त्यांना अनेक युनिक फीचर्स ऑफर करतो. यापैकी एक फिचर तुम्हाला WhatsApp वर मॅसेज टाइप न करता पाठवण्याची परवानगी देते. होय, तुमच्या Android स्मार्टफोनच्या व्हॉइस रेकग्निशन सपोर्टमुळे हे करणे शक्य आहे. यामध्‍ये तुमचा गो-टू पार्टनर गुगल असिस्टंट असेल. यामुळे तुम्हाला तुमचा स्मार्टफोन व्हॉइस कमांडसह वापरता येतो. गुगल असिस्टंटसह स्मार्टफोन वापरकर्त्यांना एकही शब्द न लिहिता WhatsApp वर मॅसेज पाठवता येतील. आता तुम्ही विचार करत असाल कसे? चला तर मग जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती… 

हे सुद्धा वाचा : BSNL ने लाँच केले दोन नवीन मासिक प्री-पेड प्लॅन, दररोज मिळणार 2 GB डेटा

टाइप न करता WhatsApp मॅसेज पाठवण्यासाठी, तुम्हाला फक्त या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील : 

स्टेप 1. तुमच्या फोनवर Google Assistant ऍप उघडा.

स्टेप 2. स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात उपलब्ध असलेल्या तुमच्या प्रोफाइल फोटोवर क्लिक करा.

स्टेप 3. Popular Settings वर टॅब करा , खाली स्क्रोल करा आणि Personal Results पर्याय ऑन करा.

स्टेप 4. तुमचा व्हॉइस असिस्टंट ऍक्टिव्ह करण्यासाठी 'OK Google' किंवा 'Hey Google' म्हणा.

स्टेप 5. नंतर म्हणा: "(संपर्क नाव) वर WhatsApp मॅसेज पाठवा"

स्टेप 6. आता त्या संपर्कासह एक विंडो उघडेल, जी तुम्हाला मॅसेज बोलण्यास सांगेल. तुम्ही जे बोलता ते आपोआप टाईप केले जाईल.

स्टेप 7. यानंतर तुम्हाला फक्त 'PLEASE SEND' किंवा 'OK, SEND' असे म्हणावे लागेल आणि तुमचा मॅसेज टाइप न करता पुढील संपर्कापर्यंत पोहोचेल.

पूर्णपणे हँड्स फ्री एक्सपेरियन्ससाठी, तुम्हाला तुमचा फोन अनलॉक न करता Google असिस्टंट वापरण्यासाठी इनेबल करणे आवश्यक आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo