5G स्पीडमध्ये लवकर संपतोय डेली डेटा, फोनमध्ये लगेच करा ‘या’ सेटिंग्स

Updated on 28-Apr-2023
HIGHLIGHTS

युजर्स 5G नेटवर्कचा मनसोक्त आस्वाद घेत आहेत.

त्यामुळे, फोनमधील डेली डेटा लवकर संपतोय.

फोनमध्ये फक्त दोन सेटिंग्स केल्यास ही समस्या उरणार नाही.

टेलिकॉम दिग्गज AIRTEL आणि रिलायन्स JIO 5G नेटवर्कचे देशभरात झपाट्याने विस्तार होत आहे. 5G नेटवर्कचे लॉन्चिंग मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये झाले. आता युजर्स 5G नेटवर्कचा मनसोक्त आस्वाद घेत आहेत. मात्र, तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल, 5G स्पीडसह तुमच्या फोनचा दररोजचा डेटा लवकरच संपतोय. तुमच्या याच समस्येवर आम्ही तोडगा घेऊन आलो आहोत. तुमचं अँड्रॉइड फोनमध्ये काही सेटिंग्स केल्यास डेटा लवकर संपणार नाही. 

अतिरिक्त ऍप्स अनइन्स्टॉल करा.

स्मार्टफोनमध्ये असे अनेक ऍप्स असतात, ज्यांचा वापर आपण करत नाही किंवा कमी करतो. हे ऍप्स आपला डेटा बॅकग्राउंडमध्ये खर्च करत असतात. त्यासाठी तुमच्या स्मार्टफोनमध्ये कोणते ऍप्स तुम्ही जास्त वापरत नाही किंवा कोणते ऍप्स तुमच्यासाठी आवश्यक नाहीत ते पहावे लागेल. त्यानंतर फोनवरील सर्व अनावश्यक ऍप्स अनइंस्टॉल करा. यामुळे तुमच्या दैनंदिन इंटरनेट डेटाची बचत होणार आहे.  

ऑटो अपडेट बंद करा.

जर तुमच्या फोनमध्ये ऑटो अपडेट नेहमीच सुरु राहत असेल तर, तुमचा डेली डेटा लवकर संपतो. नेहमीच ऍप अपडेटसाठी तयार होतात. त्यानंतर ते आपोआप मोबाइल डेटावर स्वतःला अपडेट होतात, ज्यामुळे तुमचा दैनंदिन डेटा विनाकारण युज होतो. 

ऑटो अपडेट बंद करण्यासाठी सर्व प्रथम प्ले स्टोअरवर जा. आता तुम्हाला सेटिंगमध्ये जावे लागेल. येथे तुम्हाला Network Preferences विभाग मिळेल. त्यावर क्लिक केल्यावर Auto Updates Apps हा पर्याय दिसेल. पुढील विंडोमध्ये, तुम्हाला Don’t Auto Update Apps वर क्लिक करावे लागेल.

 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :