असे वाचवा मोमो चॅलेंज सारख्या खतरनाक गेम पासून तुमच्या मुलांना

Updated on 31-Aug-2018
HIGHLIGHTS

ब्लू व्हेल गेम नंतर आता मोमो चॅलेंज मध्ये अडकत चाललेल्या मुलांना आशा प्रकारे वाचवले जाऊ शकते.

खुप दिवसांनी आपण मोमो चॅलेंज समस्येबाबत ऐकत आहोत ज्यामुळे अनेक निरागस जीव गेले आहेत. काही लोक यावर चर्चा करत आहेत की खरच असा कोणता गेम आहे का आणि त्यामुळे कोणाचा जीव जाऊ शकतो का? 

आपण नुसतेच प्रश्न विचारत आहोत पण अशा संकटात अडकतात ती लहान मुले आणि कधीकधी चांगली समजूतदार माणसे पण अडकतात. 20 ऑगस्टला दार्जिलिंग मधील कुर्सिओंग मधील 18 वर्षीय मनीष सर्की आणि 26 वर्षीय अदिती गोयल यांनी स्वतःचा जीव घेतला. जलपाईगुडी, कुर्सिओंग, पश्चिम मेदिनापुर, कोलकत्ता आणि राजस्थान मधून मोमो चॅलेंज संबंधी बातम्या येत आहेत. एक गेम खेळता खेळता कोणी आत्महत्या कशी काय करू शकतो, हे आधी सविस्तर समजून घेऊ. 

जेव्हा लहान मुले मोमो चॅलेंज किंवा अशा प्रकारचा कोणताही खतरनाक गेम खेळायला सुरावत करतात तेव्हा ते उत्साहित असतात, आत्मविश्वासाने भारलेले असतात. 
पण शेवटचे टास्क म्हणजे आत्महत्या पर्यंत पोहोचे पर्यंत त्यांची भीती, एकटेपणा, दुःख या भावना वाढलेल्या असतात आणि ते मानसिक तणाव आणि निराशेच्या गर्तेत सापडलेले असतात. कसा असतो हा गेम, आणि या गेम मध्ये अडकलेल्या मुलांना कसे ओळखावे, कसे वाचवावे आणि आशा प्रकारच्या गेम्स पासून कसे दूर ठेवावे? 
आशा प्रकारे सुरू होतो हा खेळ मोमो चॅलेंज चा 

व्हाट्सॅप वर किंवा मेसेंजर वर मुलांना एक मेसेज येतो आणि एका मेसेज मधून त्यांना एक लिंक देण्यात येते. जी त्यांना ओपन करावी लागते. त्यानंतर त्यांना एक एक करून टास्क दिले जातात. 

तेव्हा ‘मी डरपोक नाही’ हे सिद्ध करण्यासाठी जोशात येऊन मुलं सांगितलेले चॅलेंजेसचा स्विकारता आणि जसे जसे सांगितले जाते तसेच करतात. पण मग हळूहळू ते यात अडकत जातात.  

ज्यांना माहिती असते की गेमच्या शेवटी तो माणूस त्यांना आत्महत्या करण्यासाठी सांगेल, ते पण हा गेम खेळायला सुरुवात करतात. कारण त्यांना पूर्णपणे विश्वास असतो की हा माणुस त्यांच काहीच वाकडे करू शकत नाही. कारण तो त्यांच्या पासून खुप दुर आहे आणि तो फक्त त्यांना आत्महत्या करायाला सांगू शकतो, मजबूर करू शकत नाही. 

पण इथे 2 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. एक म्हणजे तो माणूस ज्याला वाटते की तुम्ही आत्महत्या करावी तो काही लिंक्स पाठवतो. म्हणजे त्याने पाठवलेल्या लिंक्स हॅकिंग सॉफ्टवेयर, किंवा अॅप असण्याची शक्यता आहे. हा फक्त एक अंदाज आहे, पण हे सत्य असू शकते. विशेष म्हणजे तुम्ही ते सॉफ्टवेयर, अॅप स्वतःच्या मर्जी ने तुमच्या फोन वर इनस्टॉल करता. मग ते अॅप तुमच्या फोन मधून तुमची सर्व इनफार्मेशन, तुमचे फोटो, वीडियो आणि डाक्यूमेंट्स पण चोरतो आणि तुमचे लोकेशन पण ट्रॅक करू लागतो. ही हॅकिंग इथपर्यंत होऊ शकते की, तुमच्या नकळत तुमच्या फोन, टॅब, लॅपटॉप इत्यादीचा कॅमेरा ऑन करून तुमच्या वर नजर ठेवली जाईल आणि तुम्ही काय करत आहात यावर लक्ष्य ठेवले जाईल. 

मुलांची खाजगी माहिती चोरून त्यांना ब्लॅकमेल केले जाऊ शकते. तो माणूस मुलांना असे भासवत असतो की तो त्याच्या मर्जीने त्यांना कुटुंबातील सदस्यांसह मारू शकतो. अशा प्रकारे मुलांना वाटू लागते की फक्त आत्महत्या करून म्हणजे लास्ट टास्क पूर्ण करूनच आपल्या कुटुंबाला वाचवता येईल. 

दुसरी गोष्ट, तो मुलांना कशा प्रकारे विश्‍वसात घेतो? तो मुलांकडून स्वतःला हानि पोहोचवण्याचे टास्क करवून घेतो. ज्यामुळे मुलं वेगाने भावनात्मक दृष्ट्या कमजोर होतात. टास्क मधील क्रूरता वाढते आणि मुलं मानसिक दृष्ट्या आजारी आणि कमजोर होत जातात. लास्ट टास्क पर्यंत पोहोचता पोहोचता मुलं मानसिक दृष्ट्या पूर्णपणे आजारी झाले असतात. त्यामुळे आत्महत्येची कारणे गेम नसून मानसिक आजार आणि भावनात्मक कमजोरी, हतबल होणे. त्यांचा तो विचार की आता कोणीच वाचवू शकत नाही, ही आहेत. 

तुमच्या आसपास या गेम मध्ये अडकलेल्या मुलांना कसे ओळखावे 
जर कोणी स्वतः मध्येच हरवून जात असेल, आपल्या परिवारातील सदस्यांशी किंवा मित्रांशी कमी बोलू लागला असेल तर कदाचित तो हा गेम खेळत असू शकतो. 
जर तुमचा मुलगा किंवा मुलगी घरातून पळून जाण्याच्या किंवा मारण्याच्या गोष्टी करत असतील तर लक्ष असू दे, कदाचीत ती किंवा तो असाच गेम खेळत असू शकतात. 

मुलांच्या झोपण्याच्या किंवा जेवणाच्या सवायींमधे अचानक बदल झाला असेल तर त्यावर लक्ष ठेवा. 

त्यांना कसलाही त्रास होत नाही याची काळजी घ्या.  मोमो चॅलेंज गेम मध्ये अडकलेल्या मुलांना कसे वाचवावे जर तुम्हाला समजले की तुमचा मुलगा किंवा मुलगी मोमो चॅलेंज गेम खेळत आहे तर  सर्वात आधी अशा प्रकारच्या गेम पासून दूर राहणे आवश्यक आहे आणि हाच सर्वात मोठा उपाय आहे.  त्यांचा इंटरनेट वापर त्वरित बंद करा. 

विभागातील पोलिसांना कळवा. 

त्यानंतर त्यांच्यावर होणार्‍या उपचारादरम्यान त्यांना साथ द्या. 

उपचारादरम्यान तसेच त्यानंतर पण मुलांच्या सोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. 

त्यांना जास्त वेळ एकटे ठेऊ नका आणि त्यांच्यावर ओरडू नका. 

चाइल्ड साइकोलोजिस्ट ची मदत घ्या. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :