WhatsApp वर आलेल्या आक्षेपार्ह मॅसेजेसची तक्रार करा.
ब्लॉक करण्याबरोबरच तक्रार करणेही आवश्यक आहे.
चॅटचा रिपोर्ट केल्यानंतर, मेसेजिंग प्लॅटफॉर्म आवश्यक ती कारवाई करेल.
लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp चा वापर जगभरातील लाखो वापरकर्ते चॅटिंगसाठी आणि संपर्कात राहण्यासाठी करतात. त्यावर उपलब्ध असलेल्या अनेक फीचर्ससह चॅटिंग करणे खूप सोपे आणि मजेशीर देखील आहे. परंतु या प्लॅटफॉर्मचा गैरवापर करणारे लोक मोठ्या संख्येने आहेत. अनेक वेळा यूजर्सना या ऍपवर नको असलेल्या आणि अश्लील मॅसेजचा सामना करावा लागतो.
यासोबतच व्हॉट्सऍपवर 'व्ह्यू वन्स' फीचरच्या मदतीने फोटो किंवा व्हिडीओ पाठवण्याचा पर्यायही उपलब्ध आहे, ज्याद्वारे पाठवलेले मेसेज एकदाच पाहता येतात. या फीचरचा वापर करून जर तुम्हाला कोणी आक्षेपार्ह किंवा अश्लील फोटो-व्हिडिओ पाठवला असेल तर त्याची तक्रार करता येते आणि तसे करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण यादारे लोकांना फसवण्याचा कामही सर्रासपणे सुरु आहे.
Android युजर्स पुढीलप्रमाणे रिपोर्ट करू शकतात…
> सर्वप्रथम तुमच्या फोनवर WhatsApp उघडा.
> मेसेज पाठवल्यानंतर ज्याच्या बाजूने आक्षेपार्ह दृश्य आहे ते वैयक्तिक चॅट उघडा.
> येथे वरच्या उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉट्सवर टॅप करा, त्यानंतर 'रिपोर्ट कॉन्टॅक्ट मॅसेज' पर्याय दिसेल.
> तुम्ही अनोळखी नंबरवरून पाठवलेल्या मॅसेजची तक्रार देखील करू शकता.
iPhone वर 'अशा'प्रकारे रिपोर्ट करता येईल…
> व्हॉट्सऍप आक्षेपार्ह कंटेंट ज्या संपर्ककडून आला, त्या मॅसेजची तक्रार करायची आहे ते चॅट उघडा.
> स्क्रीनच्या बॉटमला असलेल्या तीन डॉट्सवर टॅप करा आणि 'रिपोर्ट कॉन्टॅक्ट' पर्याय निवडा.
> चॅटचा रिपोर्ट केल्यानंतर, मेसेजिंग प्लॅटफॉर्म आवश्यक ती कारवाई करेल.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.