Google शोध परिणामांमधून स्वतःबद्दल माहिती कशी रिमूव्ह कराल? सोपा मार्ग जाणून घ्या…

Updated on 26-Sep-2022
HIGHLIGHTS

तुमच्या प्रायव्हसीसाठी गुगलने आणली नवी सुविधा

'Results About You' गुगलकडून नवी सुविधा उपलब्ध

आता वेबसाईट्सवरून तुमच्या बद्दल माहिती हटविणे झाले सोपे

डिजिटल आणि सोशल मीडियाच्या युगात, आपल्या प्रायव्हसीचे संरक्षण करणे हे एक मोठे आव्हान आहे. आपल्यापैकी बरेच जण फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर सारख्या सोशल मीडियावर नाव, फोन नंबर, पत्ता आणि ईमेल पत्ता इत्यादी माहिती शेअर करतात. मात्र, या मोठ्या वेबसाइट्स आहेत आणि त्यांचे प्रायव्हसी धोरण मजबूत आहे. परंतु अशा अनेक वेबसाइट्स आहेत, ज्या आपल्या वैयक्तिक माहितीचे संरक्षण करत नाहीत. अशा परिस्थितीत तुमची वैयक्तिक माहिती अगदी बँक तपशील देखील ऑनलाइन होतात. जेव्हा हे तपशील Google वर दिसू लागतात तेव्हा सर्वात मोठी समस्या येते. आजच्य लेखात आम्ही तुम्हाला Google शोध परिणामांमधून ही वैयक्तिक माहिती कशी काढायची ते सांगणार आहोत. जाणून घ्या सोपी पद्धत… 

हे सुद्धा वाचा : Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro ची किंमत लाँचपूर्वी लीक, जाणून घ्या अपेक्षित किमंत

'Results About You' नवी सुविधा

गुगलने नुकतीच युजर्ससाठी 'Results About You' ही सुविधा सुरू केली आहे. हे फिचर Google वरून वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती काढून टाकण्यासाठी तयार करण्यात आले आहे. या फीचरच्या मदतीने तुम्हाला  तुमची वैयक्तिक माहिती स्वतः हटवता येईल. यासाठी तुम्हाला गुगल सपोर्ट पेजवर जावे लागेल, त्यानंतर सर्च रिझल्टमधून तुम्हाला जी URL काढायची आहे, त्याचा उल्लेख करणारा फॉर्म भरा. तुम्ही या फॉर्ममध्ये एकाच वेळी अनेक URL जोडू शकता. यानंतर गुगल या पेजेसची पडताळणी करेल आणि जर तुम्ही दिलेली माहिती बरोबर असेल तर ती बंद केली जाईल. पण, या प्रक्रियेस जरा वेळ लागेल.

'अशा' वेबसाइटवरून थेट हटवा

वैयक्तिक माहिती काढून टाकण्याचा दुसरा मार्ग म्हणजे त्या पेजवर थेट भेट देऊन वैयक्तिक माहिती हटविण्याची विनंती करणे. यासाठी तुम्हाला URL च्या शेजारी असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करावे लागेल आणि नंतर 'About this result' पेजवर जावे लागेल. येथून रिमूव्ह रिझल्ट या ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर पेज रिमूव्ह करण्याची प्रक्रिया सुरू होईल.

'या'प्रमाणे रिक्वेस्ट ट्रॅक करा

या दोन्ही प्रक्रियेनंतर तुम्ही तुमची रिक्वेस्ट ट्रॅक करू शकता. यासाठी तुम्हाला गुगल ऍपवर जाऊन 'रिझल्ट्स अबाऊट यू' वर जावे लागेल आणि तुम्ही तुमच्या प्रोफाईल फोटोवर क्लिक करताच तुम्हाला रिक्वेस्टचे स्टेटस पाहता येईल. इतकंच नाही तर इथे रिक्वेस्ट स्टेटस पाहण्यासोबतच तुम्ही नवीन रिमूव्ह रिक्वेस्ट देखील जोडू शकता.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :