अवघड Wi-Fi पासवर्ड लक्षात ठेवणे सोपे नसते. लोक अनेकदा त्यांच्या Wi-Fi पासवर्ड विसरतात. खरं तर, असा पासवर्ड ठेवणे नेहमीच सोयीस्कर असते, जो केवळ मजबूतच नाही तर सहजासहजी क्रॅक होऊ शकत नाही आणि या प्रक्रियेत लोक स्वतःचा पासवर्ड विसरतात. पासवर्डमधील जटिल कॉम्प्लेक्स कॅरेक्टर पासवर्ड विसरण्यास कारणीभूत ठरू शकतात. पण आता अजिबात काळजी करू नका. आज आम्ही तुम्हाला एक अशी युक्ती सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्हाला तुमचा Wi -Fi पासवर्ड पुन्हा रिस्टोअर करता येईल.
हे सुद्धा वाचा : ऑफर चुकवू नका ! बजेटमध्ये आला iPhone 12, स्मार्टफोनवर मिळतेय प्रचंड सवलत
स्टेप 1 : तुमच्या Android फोनवर सेटिंग्ज उघडा.
स्टेप 2 : वाय-फाय टॅबवर टॅप करा.
स्टेप 3 : वापरकर्ताने कनेक्ट केलेले Wi-Fi नेटवर्क पर्याय निवडा.
स्टेप 4 : Wi-Fi QR कोडवर टॅप करून पुढे जा.
स्टेप 5 : पासवर्ड पुनर्प्राप्त करण्यासाठी, फोनचा अनलॉक पिन, फिंगरप्रिंट किंवा फेस अनलॉक वापरून स्क्रीन अनलॉक करावी लागेल.
स्टेप 6 : फोन अनलॉक केल्यानंतर, उघडणाऱ्या नवीन स्क्रीनवर QR कोड आणि Wi-Fi पासवर्ड दिसेल.
स्टेप 7 : आता, QR कोड स्कॅन करून किंवा पासवर्ड वापरून इतर डिव्हाइसशी कनेक्ट करणे सोपे आहे.