Wi-Fi पासवर्ड विसरलात? काळजी करू नका, ‘अशा’प्रकारे होईल रिकव्हर, बघा सोप्या स्टेप्स

Wi-Fi पासवर्ड विसरलात?  काळजी करू नका, ‘अशा’प्रकारे होईल रिकव्हर, बघा सोप्या स्टेप्स
HIGHLIGHTS

Wi-Fi पासवर्ड विसरल्यास काळजी करू नका

पासवर्ड रिकव्हर करण्यासाठी खास युक्ती आहे

Wi -Fi पासवर्ड कसा रिस्टोअर करण्यासाठी सोप्या स्टेप्स बघा...

अवघड Wi-Fi पासवर्ड लक्षात ठेवणे सोपे नसते. लोक अनेकदा त्यांच्या Wi-Fi पासवर्ड विसरतात. खरं तर, असा पासवर्ड ठेवणे नेहमीच सोयीस्कर असते, जो केवळ मजबूतच नाही तर सहजासहजी क्रॅक होऊ शकत नाही आणि या प्रक्रियेत लोक स्वतःचा पासवर्ड विसरतात. पासवर्डमधील जटिल कॉम्प्लेक्स कॅरेक्टर पासवर्ड विसरण्यास कारणीभूत ठरू शकतात. पण आता अजिबात काळजी करू नका. आज आम्ही तुम्हाला एक अशी युक्ती सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्हाला तुमचा Wi -Fi पासवर्ड पुन्हा रिस्टोअर करता येईल.

हे सुद्धा वाचा : ऑफर चुकवू नका ! बजेटमध्ये आला iPhone 12, स्मार्टफोनवर मिळतेय प्रचंड सवलत

तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोनवरून Wi -Fi पासवर्ड कसा रिस्टोअर करायचा, बघा स्टेप्स:

स्टेप 1 : तुमच्या Android फोनवर सेटिंग्ज उघडा.

स्टेप 2 : वाय-फाय टॅबवर टॅप करा.

स्टेप 3 : वापरकर्ताने कनेक्ट केलेले Wi-Fi नेटवर्क पर्याय निवडा. 

स्टेप 4 : Wi-Fi QR कोडवर टॅप करून पुढे जा. 

स्टेप 5 : पासवर्ड पुनर्प्राप्त करण्यासाठी, फोनचा अनलॉक पिन, फिंगरप्रिंट किंवा फेस अनलॉक वापरून स्क्रीन अनलॉक करावी लागेल.

स्टेप 6 : फोन अनलॉक केल्यानंतर, उघडणाऱ्या नवीन स्क्रीनवर QR कोड आणि Wi-Fi पासवर्ड दिसेल.

स्टेप 7 : आता, QR कोड स्कॅन करून किंवा पासवर्ड वापरून इतर डिव्हाइसशी कनेक्ट करणे सोपे आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo