सध्या, WhatsApp आपल्या वापरकर्त्यांना नवीन युजरफेस देण्यासाठी फीचर्स आणि सुविधांमध्ये बदल करत आहे. व्हॉट्सऍपवर व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलिंगची सुविधाही उपलब्ध आहे. काही वेळा काही गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला कॉल रेकॉर्ड करणे आवश्यक असते. तर, या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला काही सोप्या पद्धती सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही व्हॉट्सअॅपचे व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल्स सहज रेकॉर्ड करू शकाल. चला जाणून घेऊया संपूर्ण पद्धत…
हे सुद्धा वाचा : JIO युजर्ससाठी झटका! मोफत Disney + Hotstar सब्स्क्रिप्शनसह येणारे प्लॅन्स बंद
खरं तर, सध्या WhatsApp कॉल रेकॉर्ड करण्याचा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला व्हॉट्सऍप व्हॉईस कॉल रेकॉर्ड करायचे असतील तर तुम्हाला थर्ड पार्टी ऍप वापरावे लागेल. व्हॉट्सऍप व्हॉईस कॉल रेकॉर्ड करण्यासाठी, प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअरमधून एक चांगले थर्ड पार्टी ऍप डाउनलोड करा.
Android डिव्हाइसवर कॉल रेकॉर्ड करण्यासाठी तुम्ही Cube Call ऍपचीही मदत घेऊ शकता. ऍप डाउनलोड आणि इन्स्टॉल केल्यानंतर व्हॉट्सऍप ओपन करा. आता WhatsApp वर कॉल करण्यासाठी, तुम्हाला एक वेगळे क्यूब कॉल विजेट दिसेल. आता तुम्ही WhatsApp वर कॉल करता तेव्हा ते तुमचा कॉल रेकॉर्ड करेल आणि फोन स्टोरेजमध्ये सेव्ह करेल.
Android आणि IOS प्लॅटफॉर्मवर असे फीचर आहे, ज्याद्वारे व्हिडिओ कॉल सहज रेकॉर्ड केले जाऊ शकतात. या फीचरचे नाव 'स्क्रीन रेकॉर्डिंग' होय. तुम्हाला हे फीचर एकदाच सक्रिय करावे लागेल आणि त्यानंतर कोणत्याही समस्येशिवाय व्हिडिओ कॉल आपोआप रेकॉर्ड होईल. आजकाल अनेक स्मार्टफोनमध्ये स्क्रीन रेकॉर्डची सुविधा उपलब्ध आहे.
तुमच्या स्मार्टफोनमध्ये स्क्रीन रेकॉर्डिंग फीचर नसल्यास, तुम्हाला Google Play Store वरून DU Recorder ऍप डाउनलोड करावे लागेल. हे ऍप उघडताच आवश्यक परवानगीचा पर्याय तुमच्यासमोर येईल. त्यावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला सहजपणे व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करता येईल.