जाणून घ्या, चॅट सुरक्षसित ठेवण्यासाठीची सोपी प्रक्रिया
बहुतेक लोक त्यांच्या स्मार्टफोनमध्ये पासवर्ड किंवा पॅटर्न ठेवतात, जेणेकरून आपल्या फोनमध्ये असलेले तपशील इतर कोणी पाहू शकत नाहीत. पण आपल्या जवळच्या अनेकांना आपला पासवर्ड आणि पॅटर्न माहीत असतो. अशा परिस्थितीत, सर्वप्रथम प्रत्येकाला आपले व्हॉट्सऍप उघडून ते पाहता येईल. पण तुमची व्हॉट्सऍप चॅट इतर लोकांनी वाचू नये असे तुम्हाला वाटत असेल, तर ही बातमी तुमच्या कामाची आहे, आज आम्ही तुम्हाला यापासून वाचण्याचा उपाय सांगणार आहोत.
व्हॉट्सऍपमध्ये तुम्हाला फिंगरप्रिंट लॉकची खास सुविधा मिळते. जेव्हा हे वैशिष्ट्य सक्रिय केले जाते, तेव्हा तुम्ही तुमचा फोन अनलॉक केल्यानंतरही ऍप अनलॉक करण्यासाठी तुम्हाला तुमच्या फिंगरप्रिंटचा वापर करावा लागेल. यामुळे सिक्युरिटी वाढते. ज्यामुळे, तुम्ही एकमेव व्यक्ती आहात जी त्या मोबाइल डिव्हाइसवर WhatsApp ऍक्सेस करू शकते.
Android फोनवर WhatsApp फिंगरप्रिंट लॉक कसे सुरू करावे ?
> तुमच्या फोनवर WhatsApp उघडा आणि सेटिंग्जवर टॅप करा.
> आता Account वर टॅप करा आणि Privacy वर जा.
> येथे तुम्हाला फिंगरप्रिंट लॉकचा पर्याय दिसेल.
> फिंगरप्रिंटसह अनलॉक चालू करा आणि नंतर तुमच्या फिंगरप्रिंटची पुष्टी करा.
iOS डिव्हाइसवर WhatsApp फिंगरप्रिंट लॉक कसे सुरू करावे ?
> तुमच्या फोनवर WhatsApp उघडा आणि सेटिंग्जवर टॅप करा.
> आता Account वर टॅप करा आणि Privacy वर जा.
> त्यानंतर स्क्रीन लॉकमध्ये जा आणि Touch ID किंवा Face ID ऑन करा.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.