ONDC : खुशखबर! खाद्यपदार्थ मिळतायेत अगदी स्वस्तात, ‘अशा’प्रकारे करा ऑर्डर

Updated on 10-May-2023
HIGHLIGHTS

ONDC वर जेवण किंवा कोणतेही खाद्यपदार्थ अगदी स्वस्तात मिळतात.

ONDC ऍप सप्टेंबर 2022 मध्ये सुरु झाले होते.

या ऍपची सर्व्हिस सर्वप्रथम बंगळुरूमध्ये सुरु झाली होती.

शहरात विद्यार्थी रूम करून एकटे असतात. बरेच जण भोजनालयात जेवण करतात किंवा स्वतः स्वयंपाक करतात. मात्र, काही तरी चविष्ट खाण्याची इच्छा नेहमीच सतावत असते. यासाठी ऑनलाईन साईट म्हणजेच Swiggy आणि Zomato वरून खाद्य पदार्थ मागवणे, अगदी सोपे आणि सहज आहे. तुम्हाला फक्त पेमेंट करावे लागेल आणि अन्न तुमच्या दारापर्यंत पोहोचवले जाईल.

त्यामुळे ऑनलाईन जेवण मागवण्याची ट्रेंड बरेच वाढले आहे.  Swiggy आणि Zomato सह 'ONDC' म्हणून  सरकारी साईटदेखील आता पुढे आली आहे. विशेष म्हणजे या साईटवर जेवण किंवा कोणतेही खाद्यपदार्थ अगदी स्वस्तात मिळतात. बघुयात सविस्तर- 

ONDC वर स्वस्तात मिळतोय अन्न

  ONDC ऍप सप्टेंबर 2022 मध्ये सुरु झाले होते. आता हे प्लॅटफॉर्म चर्चेत आले आहे. अहवालानुसार, या याद्वारे रोज 10 हजार ऑर्डर्स डिलिव्हर होतात. युजर्स या ऍपद्वारे स्वस्तात फूड मागवून सोशल मीडियावर स्क्रिनशॉट देखील शेअर करत आहेत. त्यामुळे हे ऍप अधिक लोकप्रिय होत आहे. 

या ऍपची सर्व्हिस सर्वप्रथम बंगळुरूमध्ये सुरु झाली होती. अधिकृत वेबसाइटनुसार, ONDC आता मुंबई, पुणे, बंगळुरू, नोएडा, कोलकाता आणि चेन्नईसह 236 शहरांमध्ये कार्यरत आहे. 

 तुम्ही Paytm ऍपद्वारे तुम्ही तुमच्या शहरात ONDC देखील घेऊ शकता. रेस्टॉरंटची सुविधा आपल्या शहरात उपलब्ध असणे अनिवार्य आहे.

ONDC वरून फूड कसे ऑर्डर कराल ?

– Paytm वर ONDC सर्च करा.

– येथे तुम्हाला ONDC स्टोअर आणि अनेक प्रकारच्या वस्तू दिसतील.

– स्क्रीनवर फूड स्टोअरचा पर्याय दिसेल.

– ओएनडीसी फूडमध्ये जा.

– आपल्या आवडीचे फूड निवडा. 

– येथे तुम्हाला अनेक रेस्टॉरंट्स दिसतील, जे तुमच्यापर्यंत जेवण पोहोचवतील.

– आता तुम्ही तुमचे आवडते फूड ऑर्डर करू शकता.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :