How to: चिंता मिटली! घरबसल्या तुमचे Aadhar कार्ड लॉक करा, ‘अशा’ प्रकारे कुणालाही दुरुपयोग करता येणार नाही। Tech News

Updated on 26-Feb-2024
HIGHLIGHTS

Aadhar कार्ड हे देशातील सर्व नागरिकांसाठी एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे.

जेव्हा Aadhar कार्डचा गैरवापर होतो, तेव्हा मोठी समस्या निर्माण होते.

Aadhar कार्डचा दुरुपयोग रोखण्यासाठी UIDAI ने आधार कार्ड लॉक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

आज देशातील जवळपास प्रत्येकाकडे Aadhar कार्ड आहे. हे केवळ तुमचे आयडेंटिटी प्रुफच नाही तर, यासोबत Aadhar कार्ड हे देशातील सर्व नागरिकांसाठी एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. याशिवाय, तुमची सर्व महत्त्वाची कामे असून राहू शकतात. त्यामुळे जेव्हा Aadhar कार्डचा गैरवापर होतो, तेव्हा मोठी समस्या निर्माण होते. पण तुम्ही काळजी करू नका, कारण याचा दुरुपयोग रोखण्यासाठी UIDAI ने आधार कार्ड लॉक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, याबद्दल क्वचितच लोकांना माहिती आहे. चला तर मग जाणून घेऊयात Aadhar कार्ड लॉक करण्याची प्रक्रिया-

हे सुद्धा वाचा: Loksabha Election 2024: Voter ID Card बनवण्यासाठी घरबसल्या Online अप्लाय करा, बघा सोपी प्रक्रिया

ऑनलाईन तुमचे Aadhar कार्ड लॉक करा.

  • सर्व प्रथम UIDAI वेबसाइट https://uidai.gov.in वर जा.
  • आता ‘My Aadhaar’ च्या टॅबवर क्लिक करा.
  • आता Aadhaar Services विभागातून ‘Aadhaar Lock/Unlock’ पर्यायावर क्लिक करा.
  • आता ‘Lock UID’ या पर्यायावर क्लिक करा.
  • आता तुमचा आधार क्रमांक, नाव आणि पिन कोड टाका.
  • आता तुम्हाला ‘Send OTP’ वर क्लिक करा.
  • आता OTP टाका. यानंतर तुमचे आधार कार्ड लॉक केले जाईल.
Aadhar Card

SMS द्वारे Aadhaar लॉक कसा करायचा?

  • Aadhaar कार्डशी लिंक केलेल्या तुमच्या मोबाईल नंबरवरून तुम्हाला 1947 या क्रमांकावर मॅसेज पाठवा.
  • तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून, GETOTP आणि आधार क्रमांकाचे शेवटचे 4 अंक लिहा आणि 1947 वर पाठवा.
  • उदाहरणार्थ, जर तुमचा आधार क्रमांक 123456789012 असेल तर तुम्हाला ‘GETOTP 9012’ अशाप्रकारे मॅसेज लिहून पाठवावा लागेल.
  • यानंतर तुम्हाला OTP प्राप्त होईल. आता, LOCKUID OTP सोबत आधारचे शेवटचे 4 अंक लिहून मॅसेज पाठवा.
  • उदाहरणार्थ, तुमचा आधार क्रमांक 123456789012 आणि OTP क्रमांक 123456 असेल तर तुम्हाला ‘LOCKUID 9012 123456’ असे मॅसेज लिहून पाठवावा लागेल.
  • वरील सर्व प्रक्रिया सुरळीतपणे केल्यानंतर तुमचे आधार कार्ड लॉक होईल.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :