Aadhar कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. हे कार्ड तुमचे ओळखपत्र म्हणजेच ID प्रूफ म्हणून काम करते. जर तुमच्या आधार कार्डचा कुणी चुकीचा वापर केला तर हे तुमच्यासाठी धोकादायक असू शकते. त्यामुळे UIDAI त्याच्या आधार वापरकर्त्यांना ‘Aadhar लॉक/अनलॉक’ नावाचे एक उपयुक्त फिचर ऑफर करते.
हे सुद्धा वाचा: Powerful फीचर्ससह भारतात लाँच होणार Vivo चा आगामी फोल्डेबल फोन! बघा अपेक्षित किंमत। Tech News
या फिचरबद्दल बोलायचे झाल्यास, हे फिचर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक कसा वापरला जात आहे, यावर लक्ष ठेवण्याचे नियंत्रण देते. सर्व वापरकर्त्यांसाठी वैयक्तिक डेटाची सुरक्षा आणि गोपनीयता ही नेहमीच सर्वात महत्त्वाची बाब आहे. UIDAI नागरिकांना त्यांच्या आधार क्रमांकाची सुरक्षा वाढवण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण देण्यासाठी आधार क्रमांक लॉक आणि अनलॉक करण्याचे फिचर प्रदान करते.
सर्वप्रथम UIDAI च्या https://uidai.gov.in/ अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
एवढेच नाही तर, तुम्ही mAadhaar ॲपद्वारे सुद्धा पुढील प्रक्रिया फॉलो करून Aadhar लॉक करू शकता.
जेव्हा तुम्ही तुमचा आधार लॉक करता तेव्हा ते तुमच्या आधार क्रमांकाद्वारे (UID) प्रमाणीकरण अक्षम करते. यासह तुमची ओळख पडताळण्यासाठी तुमचा आधार क्रमांक कोणीही वापरू शकत नाही. तुम्ही अजूनही तुमचा व्हर्च्युअल ID (VID) प्रमाणीकरणासाठी वापरू शकता. VID म्हणजे तुमच्या आधारशी लिंक केलेला तात्पुरता 16-अंकी क्रमांक होय.