Important Tips: ‘या’ फीचरद्वारे तुमचे Aadhar कार्ड सुरक्षित करा, कुणालाही चुकीचा वापर करता येणार नाही। Tech News 

Important Tips: ‘या’ फीचरद्वारे तुमचे Aadhar कार्ड सुरक्षित करा, कुणालाही चुकीचा वापर करता येणार नाही। Tech News 
HIGHLIGHTS

तुमच्या Aadhar कार्डचा कुणीही गैरवापर करू नये यासाठी महत्त्वाचे फीचर

आधार कार्डचा कुणी चुकीचा वापर केला तर हे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.

Aadhar वापरकर्त्यांना 'Aadhar लॉक/अनलॉक' नावाचे एक उपयुक्त फिचर ऑफर करते.

Aadhar कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. हे कार्ड तुमचे ओळखपत्र म्हणजेच ID प्रूफ म्हणून काम करते. जर तुमच्या आधार कार्डचा कुणी चुकीचा वापर केला तर हे तुमच्यासाठी धोकादायक असू शकते. त्यामुळे UIDAI त्याच्या आधार वापरकर्त्यांना ‘Aadhar लॉक/अनलॉक’ नावाचे एक उपयुक्त फिचर ऑफर करते.

हे सुद्धा वाचा: Powerful फीचर्ससह भारतात लाँच होणार Vivo चा आगामी फोल्डेबल फोन! बघा अपेक्षित किंमत। Tech News

या फिचरबद्दल बोलायचे झाल्यास, हे फिचर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक कसा वापरला जात आहे, यावर लक्ष ठेवण्याचे नियंत्रण देते. सर्व वापरकर्त्यांसाठी वैयक्तिक डेटाची सुरक्षा आणि गोपनीयता ही नेहमीच सर्वात महत्त्वाची बाब आहे. UIDAI नागरिकांना त्यांच्या आधार क्रमांकाची सुरक्षा वाढवण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण देण्यासाठी आधार क्रमांक लॉक आणि अनलॉक करण्याचे फिचर प्रदान करते.

aadhar card
aadhar card

Aadhar लॉक कसे करावे?

सर्वप्रथम UIDAI च्या https://uidai.gov.in/ अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

  • आता ‘My Aadhar’ विभागात ‘Aadhar lock आणि Unlock’ सर्व्हिसवर क्लिक करा.
  • त्यानंतर ‘UID लॉक’ निवडा आणि तुमचा UID क्रमांक, पूर्ण नाव आणि पिन कोड प्रविष्ट करा.
  • त्यानंतर तुम्हाला SMS द्वारे OTP प्राप्त मिळेल. किंवा mAadhaar ॲपद्वारे व्युत्पन्न केलेला TOTP देखील निवडू शकता.
  • आता तुम्हाला प्राप्त झालेला OTP किंवा TOTP प्रविष्ट करा आणि रिक्वेस्ट सबमिट करा.
  • यशस्वी लॉकिंग केल्यानंतर तुम्हाला एक पुष्टीकरण संदेश देखील मिळेल.

एवढेच नाही तर, तुम्ही mAadhaar ॲपद्वारे सुद्धा पुढील प्रक्रिया फॉलो करून Aadhar लॉक करू शकता.

  • Google Play Store किंवा Apple App Store वरून mAadhaar ॲप डाउनलोड आणि इन्स्टॉल करा.
  • तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर आणि OTP वापरून तुमच्या mAadhaar ॲपवर लॉग इन करा.
  • आता ‘Service’ विभागात जा आणि ‘Aadhar Lock/Unlock’ ऑप्शन निवडा.
  • त्यानंतर आता ‘Lock Aadhar’ निवडा आणि स्क्रीनवरील सूचनांचे अनुसरण करा.
  • त्यानंतर, व्हेरीफिकेशनसाठी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि OTP टाकावा लागेल.

Aadhar लॉक केल्याने काय होईल?

जेव्हा तुम्ही तुमचा आधार लॉक करता तेव्हा ते तुमच्या आधार क्रमांकाद्वारे (UID) प्रमाणीकरण अक्षम करते. यासह तुमची ओळख पडताळण्यासाठी तुमचा आधार क्रमांक कोणीही वापरू शकत नाही. तुम्ही अजूनही तुमचा व्हर्च्युअल ID (VID) प्रमाणीकरणासाठी वापरू शकता. VID म्हणजे तुमच्या आधारशी लिंक केलेला तात्पुरता 16-अंकी क्रमांक होय.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo