अप्रतिम युक्ती ! मोबाईलच्या बॅकग्राउंडमध्ये ‘अशा’प्रकारे YOU TUBE वरून गाणी ऐका, जाणून घ्या कसे ?

अप्रतिम युक्ती ! मोबाईलच्या बॅकग्राउंडमध्ये ‘अशा’प्रकारे YOU TUBE वरून गाणी ऐका, जाणून घ्या कसे ?
HIGHLIGHTS

मोबाईलच्या बॅकग्राउंडमध्ये YOU TUBE वरून गाणी ऐका

या फीचरसाठी पैसे खर्च करण्याची गरज नाही

iPhone वर देखील बॅकग्राउंडमध्ये YouTube प्ले करता येईल.

YOU TUBE एक लोकप्रिय स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे. कंपनी युजर्सना प्रीमियम सब्स्क्रिप्शन देखील ऑफर करते. यु-ट्युबच्या प्रीमियम सब्स्क्रिप्शनमध्ये युजर्सना बरेच बेनिफिट्स दिले जातात. मात्र, यासाठी तुम्हाला पैसे खर्च करावे लागतील. मात्र, तुम्ही दुसऱ्या पद्धतीने देखील यु ट्यूब प्रीमियमच्या अनेक फीचर्सचा लाभ मोफत घेऊ शकता. यासाठी तुम्हाला पैसे खर्च करण्याची गरज नाही. मात्र, यासाठी तुम्हाला गुगल क्रोम मोबाईल ऍपची मदत घ्यावी लागेल. 

हे सुद्धा वाचा : Apple वॉचसारख्या डिझाइनसह Inbase Urban FIT S स्वस्त स्मार्टवॉच लाँच, ब्लूटूथ कॉलिंग फिचर उपलब्ध
 
कोणतेही पैसे खर्च न करता अँड्रॉइड फोनवर बॅकग्राउंडमध्ये YouTube प्ले केले जाऊ शकते. यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो करावे लागतील. यासाठी तुम्ही सर्वप्रथम गुगल क्रोम ब्राऊजरवर You Tube ओपन करा.

त्यानंतर तुम्हाला ते डेस्कटॉप व्ह्यूमध्ये ओपन करावे लागेल. यासाठी तुम्हाला क्रोममध्ये दिलेल्या ऑप्शनला वरच्या कोपऱ्यात असलेल्या तीन डॉट्सने ओपन करावे लागेल. यामध्ये तुम्हाला डेस्कटॉप साईटचे ऑप्शन मिळेल. यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही एखादा व्हीडिओ प्ले करा. 

व्हिडिओ प्ले झाल्यानंतर, होम बटण दाबा आणि होम स्क्रीनवर या. त्यानंतर तुम्ही फोनचे नोटिफिकेशन ओपन करून व्हिडिओ प्ले करण्याच्या पर्यायावर क्लिक करा. यासह, व्हिडिओ बॅकग्राउंडमध्ये प्ले होण्यास सुरवात होईल. तुम्हाला इयरफोनसह म्युझिक प्लेयर म्हणून याचा वापर करता येईल.

iPhone वापरकर्त्यांसाठी पद्धत : 

iPhone वर देखील बॅकग्राउंडमध्ये YouTube प्ले केले जाऊ शकते. यासाठी तुम्हाला फोनमध्ये क्रोम ब्राऊजरवरून यु ट्यूब ओपन करावे लागेल. यानंतर ऑप्शनमध्ये जा आणि रिक्वेस्ट डेस्कटॉप साईट वर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही एखादा व्हीडिओ प्ले करून होम स्क्रीनवर जा. तुमचा व्हीडिओ सुरु राहील. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo