Voter ID Card सोबत Aadhar कार्ड लिंक करण्याचा सर्वात सोपा मार्ग, घरबसल्या होणार काम

Voter ID Card सोबत Aadhar कार्ड लिंक करण्याचा सर्वात सोपा मार्ग, घरबसल्या होणार काम
HIGHLIGHTS

जवळपास सर्व बँक खात्यांशी आधार कार्ड लिंक करणे आवश्यक

मोबाईल सिमसाठीही आधार कार्ड आवश्यक आहे

घरबसल्या तुमच्या आधार कार्डशी Voter ID Card सहजपणे लिंक करता येईल.

प्रत्येक महत्त्वाच्या डॉक्युमेंट्सना Aadhar कार्ड लिंक करणे आता अनिवार्य होत चालले आहे. जसे की, सध्या जवळपास सर्व बँक खात्यांशी आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. याशिवाय मोबाईल सिमसाठी देखील आधार कार्ड आवश्यक आहे. KYC करताना जवळपास सर्व कामांसाठी तुम्हाला AADHAR कार्ड आवश्यक आहे. तसेच आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणे देखील आवश्यक आहे.

त्यामुळे, Voter ID Card देखील आधार लिंक असणे आवश्यक आहे. जर तुम्ही अद्याप तुमचे Voter ID Card तुमच्या आधार कार्डशी लिंक केले नसेल. तर काळजी करू नका, तुम्हाला हे काम अगदी सहजतेने करता येईल. तुम्ही घरबसल्या तुमच्या आधार कार्डशी मतदार ओळखपत्र सहजपणे कसे लिंक करू शकता… 

हे सुद्धा वाचा : Vodafone Idea युजर्ससाठी खुशखबर: आता नंबर पोर्ट करण्यासाठी अतिरिक्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत

तुमचा Voter ID Card आधार कार्डशी कसे लिंक कराल ? 

 जर तुम्हाला तुमच्या घरी बसून तुमचे आधार कार्ड तुमच्या Voter ID Cardशी लिंक करायचे असेल तर तुम्हाला खाली दिलेल्या काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. सर्वप्रथम ऑनलाईन पद्धत जाणून घेऊयात… 

Aadhar आणि Voter ID Card ऑनलाइन कसे लिंक करावे ?

> यासाठी तुम्हाला अधिकृत NVSP पोर्टलला जावे लागेल.

> त्यानंतर सर्च इलेक्टोरल रोल या पर्यायावर क्लिक करा.

> यानंतर पुढील पेज तुम्हाला इलेक्टोरल सर्च फॉर्मवर घेऊन जाईल, येथे तुम्ही तपशीलवार शोधू शकता आणि EPIC No. निवडू शकता.

> येथे तुमची आवश्यक माहिती टाकल्यानंतर, सिक्युरिटी कोड टाकून सर्च वर क्लिक करा.

> आता तुम्हाला फीड Aadhar  क्रमांकावर क्लिक करावे लागेल, तुम्हाला हा पर्याय डाव्या बाजूला मिळेल.

> आता तुम्हाला एक पॉप-अप विंडो दिसेल, येथे तुम्हाला तुमचा EPIC क्रमांक टाकावा लागेल. याशिवाय तुम्हाला तुमचे नाव आधार कार्डमध्ये जसे आहे तसे नाव टाकावे लागेल. तुम्हाला तुमचा UID क्रमांक देखील येथे टाकावा लागेल. त्यानंतर, तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरसह तुमचा नोंदणीकृत ईमेल ऍड्रेस  देखील प्रविष्ट करणे आवश्यक आहे. सर्व काही एंटर केल्यानंतर सबमिट बटणवर क्लिक करा.

ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला एक मॅसेज मिळेल. ज्यामध्ये तुम्हाला कळेल की तुमचे आधार कार्ड आणि  Voter ID Card  लवकरच लिंक होणार आहेत. 

SMS द्वारे आधार कार्ड आणि Voter ID Card  कसे लिंक करावे ? 

अनेक कारणांमुळे, तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र ऑनलाइन लिंक करू शकत नाही. जर असे असेल, तर SMSद्वारे तुम्ही हे काम करू शकता. 

> यासाठी तुम्हाला प्रथम SMS फॉरमॅट टाइप करावा लागेल. 

> जे खालीलप्रमाणे आहे: ECILINK<SPACE><EPIC No. of Voter ID Card No. < SPACE> Aadhaar No.>

> हा मेसेज टाईप करून तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 51969 किंवा 166 वर पाठवावा लागेल.

फोनद्वारे आधार कार्ड आणि Voter ID Card कसे लिंक करावे ? 


 
> तुम्ही फोनद्वारेही हे काम सहजपणे करू शकता. यासाठी तुम्हाला 1950 वर कॉल करावा लागेल. तुम्हाला हा कॉल सोमवार ते शुक्रवार 10 ते 5 PM दरम्यान आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून करावा लागणार आहे. 

> यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक आणि मतदार ओळखपत्र क्रमांक कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हला द्यावा लागेल.

> यानंतर ते डेटा व्हेरिफिकेशनसाठी जाणार आहे आणि एकदा सर्व काही पूर्ण झाल्यानंतर हे दोन्ही डॉक्युमेंट्स  एकमेकांशी लिंक होतील.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo