घरबसल्या Aadhaar आणि Voter ID लिंक करा, स्टेप बाय स्टेप बघा अगदी सोपी प्रक्रिया

घरबसल्या Aadhaar आणि Voter ID लिंक करा, स्टेप बाय स्टेप बघा अगदी सोपी प्रक्रिया
HIGHLIGHTS

Aadhaar आणि Voter ID लिंक करने आवश्यक

घरबसल्या Aadhaar आणि Voter ID लिंक करा

स्टेप बाय स्टेप संपूर्ण प्रक्रियेनुसार Aadhaar आणि Voter ID कसे लिंक करावे बघा...

भारतीय निवडणूक आयोग (ECI) गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये संसदेने स्वीकारलेल्या निवडणूक कायदे (सुधारणा) कायदा, 2021 अंतर्गत प्रत्येकाला त्यांचे  Aadhaar आणि Voter ID लिंक करण्यास सांगत आहे. दोन ओळखपत्रे जोडण्याचा उद्देश मतदार यादीतील नोंदींची पडताळणी करणे, मतदारांची ओळख प्रमाणित करणे आणि एकाच मतदारसंघात एकापेक्षा जास्त वेळा किंवा अनेक मतदारसंघात नोंदणी केली आहे की नाही हे तपासणे हा होय.

हे सुद्धा वाचा : BSNL अमृत ​​महोत्सव ऑफर : 399 रुपयांमध्ये भरपूर 200 GB डेटा, सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग

आता तुम्हाला तुमचे आधार कार्ड ऑनलाइन मतदार ओळखपत्राशी लिंक करायचे असेल, तर निवडणूक आयोगाने काही सोप्या स्टेप्स शेअर केल्या आहेत. तुमचे आधार आणि मतदार ओळखपत्र लिंक करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप बाय स्टेप मार्गदर्शकाचे अनुसरण करा.

Aadhaar आणि Voter ID कसे लिंक करावे:

स्टेप 1: Google Play Store आणि Apple App Store वरून फोनवर 'व्होटर हेल्पलाइन ऍप' डाउनलोड करा.

स्टेप 2: ऍप उघडा आणि 'I Agree' पर्यायावर क्लिक करा आणि 'Next' वर टॅप करा.

स्टेप 3: पहिला पर्याय 'Voter Registration' वर टॅप करा.

स्टेप 4: इलेक्टोरल ऑथेंटिकेशन फॉर्म (फॉर्म 6B) वर क्लिक करा आणि उघडा.

स्टेप 5: आता 'Let's Start' वर क्लिक करा.

स्टेप 6: आधार कार्डशी लिंक केलेला तुमचा अधिकृत मोबाईल नंबर एंटर करा आणि Send OTP वर टॅप करा आणि 'Verify' वर क्लिक करा.

स्टेप 7: आता 'Yes I Have Voter ID' वर क्लिक करा आणि नंतर 'Next' वर क्लिक करा.

स्टेप 8: आता तुमचा मतदार आयडी क्रमांक (EPIC) एंटर करा, तुमचे राज्य निवडा आणि 'Fetch details' वर क्लिक करा.

स्टेप 9: आता 'प्रोसीड' वर क्लिक करा.

स्टेप 10: आधार क्रमांक, नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आणि प्रमाणीकरण फील्ड प्रविष्ट करा आणि 'Done' वर क्लिक करा.

स्टेप 11: प्रक्रिया पूर्ण झाल्यावर फॉर्म 6B प्रिव्ह्यू पेज उघडेल. तुमचे डिटेल्स पुन्हा तपासा आणि तुमचा फॉर्म 6B फायनल सबमिशन करण्यासाठी 'Confirm' वर क्लिक करा.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo