तुम्ही एखाद्याला कॉल आणि मॅसेज करत आहात पण तरीही त्या व्यक्तीकडून प्रतिसाद मिळत नाहीये? अशा परिस्थितीत त्या व्यक्तींत तुम्हाला ब्लॉक केल्याची संभावना तयार होते. परंतु तरीही तुम्हाला यात काही शंका वाटत असेल, तर आम्ही तुम्हाला एक सोपी युक्ती सांगणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही तुमचा फोन नंबर कोणीतरी ब्लॉक केला आहे की नाही याची पुष्टी सहजपणे करू शकता.
हे सुद्धा वाचा : Realme C33 वर भन्नाट ऑफर सुरु ! फक्त रु. 549 मध्ये तुमचा होईल फोन, बघा खास ऑफर
तुम्हाला कुणी ब्लॉक केले असणे, ही तुमच्यासाठी नाराजीची गोष्ट असते. पुढील व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केले आहे की नाही हे शोधण्याचा सध्या कोणताही निश्चित मार्ग नसला तरी, तुम्हाला ब्लॉक केले आहे की नाही हे सांगणारी एक सोपी युक्ती आहे.
> तुमच्या फोनचा डायलर उघडा आणि त्या व्यक्तीला कॉल करण्याचा प्रयत्न करा.
> जर तुम्हाला एखादी रिंग ऐकू आली आणि ती 'व्यस्त' म्हणते, तर तुम्हाला कदाचित ब्लॉक केले गेले असण्याची शक्यता आहे. मात्र, आपण खरोखर ब्लॉक आहात का ? याची पुष्टी करण्यासाठी आपण 2-4 वेळा कॉल करण्याचा प्रयत्न करू शकता. पहिल्या कॉलमध्ये, तुम्हाला एक रिंग ऐकू येईल, परंतु दुसर्या, तिसर्या किंवा चौथ्या वेळी तुम्ही कोणतीही रिंग न वाजवता सरळ "आपण कॉल करत असलेला नंबर व्यस्त आहे" हे ऐकायला मिळेल.
> प्रयत्न करा आणि त्या व्यक्तीला मॅसेज करा, जर ते अनडिलिव्हर किंवा तुम्हाला व्हॉइसमेल पाठवण्यास सांगितले तर तुम्हाला ब्लॉक केले असण्याची 90 % शक्यता आहे.