तुमचे या गोष्टीकडे कदाचित कधीच लक्ष गेले नसेल आणि जरी तुम्ही लक्ष दिले जरी असेल तरी तुम्ही की किती वेळा आणि कुठे कुठे तुमचा आधार कार्ड तुम्ही ऑथेंटिकेशन इत्यादी साठी वापरला आहे. याचे एक कारण म्हणजे आपण आधार कार्ड अनेक सेवा मिळवण्यासाठी वापरतो. त्यामुळे आपण कितीवेळा आणि कोणती सेवा मिळवण्यासाठी आधार कार्ड वापरले आहे यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. जर तुम्ही याची काळजी घेतली नाही तर कदाचित तुमच्या आधार कार्डचा वापर चुकीच्या ठिकाणी होण्याची शक्यता वाढते.
म्हणुनच आपल्या आधार संबंधित सर्व माहिती तुम्हाला असणे खूप अवश्यक आहे. तुम्हाला तर माहितीच आहे की (UIDAI) यूनीक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया आधारला मॅनेज करते आणि तिथेच तुम्हाला तुमच्या या समस्येचे उत्तर मिळणार आहे. कारण आधारच्या वेबसाइट वर एक प्रोविजन आहे, जिच्या माध्यामातून तुम्ही जाणून घेऊ शकता की तुमचे आधार कार्ड कुठे आणि कधी वापरले गेले आहे.
आधारचा वापर कुठे झाला हे कसे जाणून घ्यावे
याबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्हाला या सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. त्यानंतर तुम्हाला तुम्ही तुमचा आधार ऑथेंटिकेशन इत्यादी साठी आणि कोणकोणत्या सेवा सुविधा मिळवण्यासाठी वापरला आहे याची माहिती अगदी सहज मिळेल.
1. यासाठी तुम्हाला सर्वात आधी आधारच्या अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल. या वेबसाइटची लिंक खाली दिली आहे:https://resident।uidai।gov।in/notification-aadhaar
2. त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर द्यावा लागेल, सोबत तुम्हाला खाली एक सिक्यूरिटी कोड पण दिला असेल तोही तिथे टाकावा लागेल.
3. त्यानंतर एक OTP जेनेरेट होईल.
4. जो तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर वर येईल. जर तुमचा मोबाईल नंबर आधार सोबत लिंक नसेल तर आधी तो तुम्हाला लिंक करावा लागेल.
5. तुम्हाला आलेला OTP टाकल्या नंतर सबमिट बटन वर क्लिक करा, त्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार संबंधीत वापराची सर्व माहिती मिळेल.