सोशल मीडिया आणि मेसेजिंग अॅप्समुळे आपली प्रायव्हसी कमी होत आहे. हॅकर्स सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणूक करण्यासाठी नवनवीन मार्ग शोधत आहेत. सोशल मीडियाचा वापर करताना सुरक्षित राहण्यासाठी केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर काही टिप्स सांगण्यात आले आहेत. या टिप्सचा वापर केल्यास तुम्ही हॅकर्सपासून सुरक्षित राहू शकता.
हे सुद्धा वाचा : DAIWA ने एकाच वेळी लाँच केले दोन स्मार्ट टीव्ही, मिळणार 20 वॉटचे स्पीकर
फेसबुकसारख्या (Facebook) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुम्हाला असा पर्याय उपलब्ध आहे. याद्वारे तुम्हाला तुमचं प्रोफाइल सुरक्षित ठेवता येईल. यामुळे कोणालाही तुमचे प्रोफाईल बघता येणार नाही.
फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि कू यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केल्यानंतर प्रत्येक वेळी लॉगआउट (Log Out) करा. यामुळे हॅकिंगचा (Hacking) धोका कमी होतो. इतर डिवाइसवर आपले अकाउंट लॉगिन केल्यानंतर प्रत्येक वेळी लॉगआउट करणं नेहमीच सुरक्षित ठरेल.
सोशल मीडियावर प्रत्येकाची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका. काही जण फसवणुकीच्या उद्देशानं फेक अकाउंट तयार करतात.
सोशल मीडियावर तुमचं प्रायव्हसी सेटिंग शक्य तितकं रिस्ट्रिक्टच करा. प्रोफाइल अधिक सुरक्षित कसं राहील याकडे लक्ष ठेवा.
तुम्हाला सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारची आणि विचित्र दावे करणारी लिंक आली तर त्यावर क्लिक करू नका. हॅकर्स अशा लिंक्स पाठवत असतात. त्यावर क्लिक केल्यास तुमचं अकाउंट हॅक होण्याची शक्यता असते.