इन्स्टंट मेसेजिंग ऍप WhatsApp ने आपले नवीन गोपनीयता फीचर 'ऑनलाइन स्टेटस हाइड' फीचर जारी केले आहे. आता या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमचे ऑनलाइन स्टेटस लपवू शकता. हे फिचर iOS आणि Android दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी जारी करण्यात आले आहे. अलीकडेच WhatsApp ने आपल्या नवीन एडिट मेसेज फीचरबद्दल माहिती दिली आहे.
हे सुद्धा वाचा : स्पॅम कॉल्सने वैतागलात ? जाणून घ्या 'अशा' कॉल्सना ब्लॉक कसे कराल, बघा स्टेप बाय स्टेप प्रक्रिया…
WhatsApp ने काही महिन्यांपूर्वी बीटा चाचणीसाठी 'ऑनलाइन स्टेटस हाईड' फीचर उपलब्ध करून दिले होते. या फीचरमध्ये यूजर्स त्यांचे ऑनलाइन स्टेटस स्वतःहून लपवू शकतील, त्यानंतर त्यांचे ऑनलाइन स्टेटस यूजर्सच्या कॉन्टॅक्ट्सना दिसणार नाही. या फीचरमध्ये युजरला प्रायव्हसीसाठी दोन पर्याय दिले जातील, ज्यामध्ये एका ऑप्शनमध्ये तुम्ही तुमचे ऑनलाइन स्टेटस सर्व कॉन्टॅक्ट्सना दाखवू शकता, तर दुसऱ्या ऑप्शनमध्ये तुमचे ऑनलाइन स्टेटस सर्व कॉन्टॅक्ट्ससाठी लपवले जाईल.
व्हॉट्सऍपच्या या फीचरनंतर यूजर्सचे त्यांच्या ऑनलाइन स्टेटसवर पूर्ण नियंत्रण असेल. या फिचरच्या मदतीने वापरकर्ते त्यांचे ऑनलाइन स्टेटस कोण पाहतील हे स्वतः ठरवू शकतील. म्हणजेच तुम्ही वेगवेगळ्या लोकांसाठी तुमचे ऑनलाइन स्टेटस बदलू शकता. हे फीचर WhatsApp च्या स्टेटस फीचरप्रमाणे काम करेल, ज्यामध्ये यूजरला Who Can See चा पर्याय देखील मिळेल.
व्हॉट्सऍपवर स्टेटस लपवण्यासाठी तुम्हाला I बटणावरून सेटिंगमध्ये जावे लागेल. त्यानंतर प्रायव्हसी ऑप्शनवर टॅप करा. इथून तुम्हाला आता लास्ट सीन आणि ऑनलाईनचा पर्याय दिसेल. येथे तुम्हाला दोन पर्याय पहायला मिळतात, 'माझे लास्ट सीन कोण पाहू शकते' आणि 'माझे ऑनलाइन स्टेटस कोण पाहू शकते." तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार हे दोन्ही पर्याय सेट करावे लागतील. Nobody आणि Same as last Seen असे देखील पर्याय तुम्हाला मिळतील.
एडिट मेसेज फीचरच्या मदतीने व्हॉट्सऍप मेसेज पाठवल्यानंतरही तो एडिट करता येतो. आपल्या नवीन एडिट मेसेज फीचरबद्दल माहिती देताना व्हॉट्सऍपने सांगितले की, यूजर्स त्यांचे पाठवलेले मेसेज एडिट करू शकतील. मात्र त्या मॅसेजवर 'एडिट' असे लिहून येईल. या फीचरमध्ये यूजर्सना मेसेज आल्याच्या 15 मिनिटांच्या आत मेसेज एडिट करण्याची सुविधा मिळणार आहे. वापरकर्ते 15 मिनिटांनंतर मॅसेज एडिट करू शकणार नाहीत.