आता ब्लॉक करण्याची गरज नाही, WHATSAPP वर ‘अशा’प्रकारे हाईड करा DP आणि लास्ट सिन

Updated on 30-Jul-2022
HIGHLIGHTS

WHATSAPP वर DP आणि लास्ट सिन हाईड कसे कराल ?

अलीकडेच आलेला नवीन फिचर करेल तुमची मदत

जाणून घ्या अप्रतिम युक्ती

आमच्याकडे इन्स्टंट मेसेजिंग ऍप व्हॉट्सऍपवर बरीच माहिती उपलब्ध आहे. डिस्प्ले पिक्चर (DP) आपला फोटो दाखवतो, लास्ट सीनमुळे आपण ऍप शेवटचे कधी ओपन केले याची माहिती मिळते. ही वैयक्तिक माहिती सर्वांसोबत शेअर करणे प्रत्येकाला सोयीचे वाटत नाही.

हे सुद्धा वाचा : TIPS : तुमच्या कामाचे आहेत 'हे' ऍप्स, प्रत्येकाच्या फोनमध्ये असणे आवश्यक, बघा यादी

अशा परिस्थितीत, काही वेळा कॉन्टॅक्ट लिस्टमधून असे नंबर ब्लॉक किंवा डिलीट करावे लागतात, ज्यांपासून  आपल्याला DP आणि लास्ट सीन हाईड करायची असते. पण व्हॉट्सऍपच्या काही दिवसांपूर्वी आलेल्या फीचरने ही समस्या संपवली आहे. आता तुम्ही WhatsApp सेटिंग्ज बदलून तुमचा प्रोफाइल फोटो लपवू शकता आणि लास्ट सीन लपवू शकता. 

अशाप्रकारे हाईड करा प्रोफाइल फोटो किंवा लास्ट सीन

स्टेप 1 : तुमच्या Android किंवा iPhone वर तुमचे WhatsApp उघडा.

स्टेप 2 : थ्री-डॉट पर्यायावर क्लिक करा.

स्टेप 3 : सेटिंग्ज> अकाउंट > प्रायव्हसी > प्रोफाइल फोटो वर जा.

स्टेप 4 : आता, ' My contacts except' निवडा आणि ज्या संपर्कांपासून तुम्हाला तुमची DP लपवायची आहे ते संपर्क  निवडा.

त्याचप्रमाणे, तुम्हाला लास्ट सीनसाठी My contacts except पर्याय देखील दिला जातो.

याव्यतिरिक्त, वापरकर्ते निवडलेल्या संपर्कातून त्यांचे 'About' लपवू शकतात.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :