Important! ऑनलाइन सेलमध्ये चुकीचे ऑर्डर आल्यास तक्रार कुठे करावी? कसा मिळेल Refund? वाचा सविस्तर 

Important! ऑनलाइन सेलमध्ये चुकीचे ऑर्डर आल्यास तक्रार कुठे करावी? कसा मिळेल Refund? वाचा सविस्तर 
HIGHLIGHTS

काही वेळा ऑनलाइन वस्तूंच्या ऑर्डर डिलेव्हरीमध्ये चुका होतात.

याबद्दल तक्रार कशी करायची आणि रिफंड कसा मिळवावा?

रिफंड न मिळाल्यास, तुम्ही Consumer Forum मध्ये देखील कायदेशीररित्या तक्रार नोंदवू शकता.

सणासुदीच्या काळात सर्वांच्या नजरा ऑनलाइन सेलवर असतात कारण आता ऑनलाईन शॉपिंगचे ट्रेंड भलतेच सुरु आहे. सणासुदीच्या काळात तर या सेलमध्ये अनेक ऑफर्स आणि थेट डिस्काउंट देखील मिळतात. जेणेकरून आवडीच्या वस्तू स्वस्तात खरेदी करणे, अगदी सोपे होते. सध्या Amazon-Flipkart सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सणासुदीचे विशेष सेल सुरु आहेत. या सेलदरम्यान मोठ्या सवलतीच्या ऑफर देखील मिळत आहेत. मात्र, काही वेळा ऑनलाइन वस्तूंच्या ऑर्डर डिलेव्हरीमध्ये चुका होतात. अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यात चुकीचा माल लोकांपर्यंत पोहोचवला गेला. अशा प्रकरणात ग्राहक चिंतित होतात, तर याबद्दल तक्रार कशी करायची आणि Refund कसा मिळवावा? यासाठी आम्ही तुम्हाला अगदी सोप्या प्रक्रिया सांगणार आहोत. पुढील सविस्तर माहिती संपूर्ण वाचा-

रिफंड प्रोसेस

ऑनलाइन मार्केटप्लेस तुम्हाला होम डिलिव्हरीचा पर्याय देखील देतात. जर आयटम चुकीचा निघाला तर, रिफंड प्रोसेस त्या त्या प्लॅटफॉर्मनुसार बदलते. खरं तर, रिफंड आणि रिटर्न पॉलिसी असणे कायदेशीरदृष्ट्या आवश्यक नाही, परंतु चांगली कंपनी आपल्या ग्राहकांना रिफंड आणि रिटर्न पॉलिसीचा लाभ नक्कीच देतात.

amazon order refund process

Amazon

Amazon वर सध्या GIF सेल सुरु आहे. प्लॅटफॉर्मने चुकीच्या वस्तूंच्या वितरणासाठी काही क्रायटेरिया सेट केले आहेत. जर तुमची केस त्यामध्ये बसत असेल तर तुम्ही रिफंड रिक्वेस्ट सुरू करू शकता. रिटर्न करण्यासाठी तुमहाला Returns Support Center पेजवर जावे लागेल किंवा My Orders विभागात तुमच्या त्या ऑर्डरमध्ये देखील Return चा ऑप्शन मिळेल. यामध्ये तुम्हाला आधी तपशील द्यावा लागेल, त्यानंतर रिफंडची प्रक्रिया सुरू होईल.

Flipkart

Flipkart वर जर तुम्हाला चुकीचे ऑर्डर मिळाले तर, तुम्ही Flipkart मधील My Orders पेजवर उपलब्ध फॉर्म भरून रिक्वेस्ट रिटर्न पर्याय निवडू शकता. मंजुरीनंतर, परतावा प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, पैसे तुम्हाला रिफंड केले जातील.

तुम्हाला हवे असल्यास तुम्ही थेट तुमच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकता. याशिवाय, तुम्ही Amazon Pay Balance आणि Flipkart गिफ्ट कार्डद्वारे पैसे परत करू शकता.

excitel plan user

Consumer Forum:

जर एखादी कंपनी चुकीच्या वस्तूंच्या वितरणावर परतावा देत नसेल, तर तुम्ही ग्राहक संरक्षण कायदा, 2019 ची मदत घेऊ शकता. या अंतर्गत तुम्ही Consumer Forum मध्ये कंपनीविरोधात तक्रार दाखल करू शकता. यात जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर गुन्हे दाखल केले जातात.

  • सर्वप्रथम, यामध्ये तुम्हाला विक्रेत्याला कायदेशीर नोटीस पाठवावी लागते, नोटीसमध्ये चुकीच्या वस्तूंच्या वितरणासाठी परतावा देण्याची मागणी असते.
  • जर तुम्हाला एका महिन्याच्या आत प्रतिसाद मिळाला नाही तर, तुम्ही लवकरात लवकर डिस्प्यूट्स रिड्रेसल फोरम/कमीशनमध्ये तक्रार दाखल करावी.
  • यासाठी तुम्हाला शुल्क आणि त्यासह काही महत्त्वाची कागदपत्रे सबमिट करावे लागतील.

आवश्यक कागदपत्रे: जसे की बिलाची प्रत, कायदेशीर नोटीस, गॅरंटी किंवा वॉरंटी डॉक्युमेंट्स, सर्व माहिती/पुरावे इ.

तुम्ही ग्राहक व्यवहार विभागाच्या एकात्मिक तक्रार निवारण यंत्रणा (INGRAM) पोर्टलला भेट देऊन देखील ऑनलाइन तक्रार नोंदवू शकता.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo