नॉन-रजिस्टर्ड मोबाईल नंबर द्वारे कसा मिळवावा हरवलेला Aadhaar Card?
जर तुमचा आधार कार्ड हरवला असेल आणि लाख काळजी घेऊनही जर तो तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही पुन्हा एकदा आपला आधार अगदी सहज आपल्या घरातच ऑनलाइन मिळवू शकता. चला बघूया कसे ते?
कधी कधी तुमचे महत्वाचे कागदपत्र हरवतात बऱ्याचदा ते मिळतात पण नेहमीच असे होत नाही. तुमच्यासोबत पण असे काही झाले आहे का विशेषतः आधार कार्डच्या बाबतीत. अर्थात् जर तुमचा आधार कार्ड तुम्ही कुठे तरी हरवला असेल तर तुम्ही तो अगदी सहज ऑनलाइन मिळवू शकता, पण तुमच्याकडे तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. आता तुम्ही सोच विचार करत असाल तर तुमचा आधार पण हरवला आहे आणि तुमचा नंबर पण तुम्ही एखाद्या कारणास्तव बदलला आहे आणि तो तुम्ही आधार कार्ड मध्ये अपडेट करायला विसरला आहेत तर तुम्ही काय कराल? हि विचार करण्याची स्तिथी आहे. पण तुम्हाला काळजी करण्याचे कारण नाही. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कि जर तुमच्याकडे रजिस्टर्ड मोबाईल नंबर पण नसेल आणि तुमचा आधार पण हरवला असेल तरी पण तुम्ही तुमचा आधार कार्ड पुन्हा एकदा मिळवू शकता.
बरोबर ऐकलेत तुम्ही, तुमच्याकडे रजिस्टर्ड मोबाईल नंबर नसतानाही तुम्हाला तुमचा आधार कार्ड मिळणार आहे. आता तुम्ही विचार करत असाल कि असे कसे होऊ शकते. चला तर मग बघूया.
रजिस्टर्ड मोबाईल नंबरविना कसा मिळवावा आधार कार्ड
असे करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी आधारच्या अधिकृत म्हणजे या वेबसाइट वर http://www.uidai.gov.in किंवा https://resident.uidai.gov.in जावे लागेल, इथे गेल्यानंतर सर्व प्रक्रिया सुरु होते.
1. या वेबसाइट वर गेल्यांनंतर तुम्हाला आधार रीप्रिंट साठी आपला अर्ज द्यावा लागेल, इथे तुम्हाला या वेबसाइट वर जाऊन ‘Order Aadhaar Reprint’ Service वर क्लिक करावे लागेल.
2. त्यांनतर तुम्हाला तिथे आपला 12 अंकी आधार नंबर (UID) किंवा 16 अंकांचा वर्चुअल आइडेंटिफिकेशन नंबर द्यावा लागेल.
3. त्यानंतर तुम्हाला तिथे दिसणारा सिक्यूरिटी कोड इंटर करण्यास सांगितले जाईल, तो तुम्हाला तिथे बॉक्स मध्ये टाकावा लागेल.
4. त्यानंतर दिसणाऱ्या चेक बॉक्स वर तुम्हाला टिक करावे लागेल जर तुमच्याकडे तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर नसेल.
5. तर तुमचा नॉन-रजिस्टर्ड/अल्टरनेट मोबाईल नंबर द्यावा लागेल.
6. आता तुमच्या या मोबाईल नंबर वर जो तुम्ही दिला आहे एक OTP येणार आहे.
7. आता तुम्ही सबमिट बटण वर क्लिक करताच, तुमच्या OTP/TOTP चे वेरिफिकेशन सुरु होते. हि प्रक्रिया रीप्रिंटच्या आधीची आहे.
8. त्यानंतर तुमच्याकडे पेमेंट विचारले जाते, तुम्हाला हि प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी Rs 50 द्यावे लागतील त्यानंतर तुमचा डुप्लीकेट आधार अर्थात् एक नवीन प्रिंट तुम्हाला मिळेल.
9. पेमेंट पेज वर रीडायरेक्ट झाल्यांनतर तुम्हाला तुमच्या क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड, नेट बँकिंग द्वारे किंवा UPI च्या माध्यमातून पेमेंट करावा लागेल.
10. पेमेंट यशस्वी झाल्यांनंतर तुम्हाला एक डिजिटल सिग्नेचर वाली रिसिप्ट मिळेल, जी तुम्ही PDF फॉर्मेट मध्ये डाउनलोड करू शकता, तुम्हाला SMS द्वारे याची माहिती दिली जाईल.
11. आता तुमच्या आधारच्या रीप्रिंटची प्रक्रिया सुरु झाली असेल, तुम्ही वेळोवेळी ट्रॅक पण करू शकता. इसके तसेच तुम्हाला डिलीवरी स्टेटस बद्दल पण माहिती मिळवू शकता. पण 5 दिवसांत तुमचा आधार तुम्हाला मिळाला पाहिजे.
आम्हाला आशा आहे कि तुम्हाला हि माहिती उपयोगी पडली असेल, जर तुम्हाला हि माहिती उपयोगी वाटली असेल तर आम्हाला कमेंट मध्ये कळवा.