AMAZON असो किंवा FLIPKART, ‘अशा’प्रकारे शॉपिंग करा आणि बंपर डिस्काउंट मिळवा
ऑनलाईन शॉपिंग करताना सवलत मिळवा
तुम्ही काही खास टिप्स वापरून आकर्षक सवलती मिळवू शकता
नेहमी वर्किंग डेजमध्ये शॉपिंग करा
FLIPKART आणि AMAZON सह इतर ऑनलाइन शॉपिंग साइट्सवर खरेदी करताना तुम्ही हजारो रुपयांची बचत करू शकता. खरं तर, काही छोट्या छोट्या टिप्स आहेत ज्या तुम्हाला ऑनलाइन शॉपिंग दरम्यान सर्वोत्तम डील मिळवून देऊ शकतात. ज्यामुळे तुमचे हजारो रुपये वाचवू शकतात. चला तर मग जाणून घेऊया काही छोट्या पण महत्त्वपूर्ण टिप्स…
हे सुद्धा वाचा : Vivo V25 Pro : नव्या स्मार्टफोनची आज पहिली विक्री, जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स
क्रेडिट कार्डचा वापर
जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की, ते वापरून तुम्हाला ऑनलाइन शॉपिंगमध्ये मोठी सूट मिळू शकते. खरं तर क्रेडिट कार्डवर ऑफर्स मिळण्याची सर्वाधिक शक्यता असते, त्यामुळे तुम्ही त्याबद्दल जागरूक असणे गरजेचे आहे.
वर्किंग डेजमध्ये शॉपिंग करा
तुम्ही वीकेंडला कधीही खरेदी करू नका किंवा सेल येण्याची वाट पाहू नका. कारण या काळात वस्तू लवकर संपतात आणि त्यांची किंमतही वेगाने वाढते. जर तुम्हाला कमीत कमी किमतीत वस्तू मिळाव्यात असे वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही फक्त कामाच्या दिवसातच खरेदी करावी. हीच खरी वेळ असते, जेव्हा तुम्हाला ऑनलाइन शॉपिंगमध्ये मोठी बचत करता येईल.
तुलना करा
जर तुम्हाला एखादे प्रोडक्ट घ्यायचे असेल, तर तुम्ही त्या प्रोडक्टची इतर साइट्सशी तुलना केली पाहिजे. कारण काहीवेळा तुम्हाला तेच उत्पादन अतिशय वाजवी दरात दुसऱ्या साईटवर मिळण्याची शक्यता असते. तुम्ही नेहमी इतर साइट्सवरही लक्ष ठेवावे, ही एक अतिशय प्रभावी पद्धत आहे जी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. तुम्ही या टिप्स वापरून पाहिल्यास, त्या प्रत्यक्षात काम करत असल्याचे तुम्हाला आढळून येईल आणि तुम्ही त्यांचा सहज वापर करून लाभ घेऊ शकता.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile